बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त अॅटिट्यूडमुळे ओळखल्या जातात. यात ऐश्वर्या राय-बच्चन, राणी मुखर्जी, कतरिना कैफ या अभिनेत्रींची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. काही अभिनेत्री त्यांच्या बोल्ड अॅटिट्यूडमुळे ओळखल्या जातात. तर काही जणी त्यांच्या गोड स्वभावामुळे. विशेष म्हणजे या लोकप्रिय अभिनेत्री कलाविश्वात केवळ एकाच व्यक्तीच्या तालावर नाचण्यास कायम तयार असतात. आता ती व्यक्ती नेमकी कोण ते जाणून घेऊयात. (सौजन्य : वैभवी मर्चंट इन्स्टाग्राम पेज/ सोशल मीडिया) बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चेंट हे नाव साऱ्यांनाच ठावूक असेल. अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्री वैभवीच्या तालावर सहज थिरकतात. तिने सांगितलेल्या ठेक्यावर ताल धरतात. आज वैभवीचा वाढदिवस, त्यामुळे या लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिकेविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. सलमान खान व ऐश्वर्या राय -बच्चनचा 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट विसरणं कोणत्याही व्यक्तीला शक्य नाही. या चित्रपटातील प्रत्येक गाणं, सीन सुपरहिट झालं होतं. यातलं 'ढोली तारो ढोल बाजे' हे गाणं वैभवीने कोरिओग्राफ केलं होतं. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाल्याचं सांगण्यात येतं. लगान चित्रपटातील 'ओ रे छोरी' हे गाणंदेखील वैभवीने कोरिओग्राफ केलं आहे. 'रब ने बना दी' जोडीमधील 'हौले हौले' असो किंवा 'दिल्ली 6' मधील 'मसकली' ही गाणी सुद्धा वैभवीनेच कोरिओग्राफ केली आहेत. देवदास चित्रपटातील 'बैरी पिया' या गाण्यासाठी ऐश्वर्या रायला वैभवीने डान्स शिकवला होता. सलमान खानच्या 'भारत' चित्रपटातही 'ऐथे आ' या गाण्यासाठी वैभवीने कतरिनाला डान्स शिकवला. 'बंटी और बबली'मधील 'कजरा रे' हे गाणं तर साऱ्यांच्याच लक्षात असेल हे गाणंदेखील वैभवीने बसवलं आहे. बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी वैभवीने कोरिओग्राफ केली आहेत. वैभवी मर्चेंट हे सध्याच्या घडीला कलाविश्वातील लोकप्रिय नाव असून तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. वैभवीने कोरिओग्राफी करण्याव्यतिरिक्त काही रिअॅलिटी शोमध्ये देखील परिक्षक म्हणून काम केलं आहे. नच बलिए 3 , झलक दिखला जा ( सीजन 3), जरा नच के दिखा 2, जस्ट डान्स या कार्यक्रमांचं परिक्षकपद वैभवीने भूषवलं आहे. -
लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक, डान्सर, अभिनेता, दिग्दर्शक प्रभूदेवासोबत वैभवी मर्चंट
-
रणवीर सिंग आणि वैभवी यांचा झक्कास सेल्फी
-
राणी मुखर्जी आणि वैभवी एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि वैभवी.

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?