
'ये है मोहब्बते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी. (फोटो सौजन्य : anita hassanandani ,Rohit Reddy, pegasusfete इन्स्टाग्राम पेज.) 
अनिता लवकरच आई होणार असून सध्या ती तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. 
अलिकडेच अनिताचं बेबीशॉवर पार पडलं. या कार्यक्रमाचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
या सोहळ्यात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती. 
या सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास असावी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचं दिसून येत आहे. 
अनिता अनेकदा बेबीबंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. -
बेबी शॉवरसाठी अनिताने परिधान केलेला खास ड्रेस
-
आई होण्याचा आनंद अनिताच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
-
अनिताने हे बेबी शॉवर चांगलंच एन्जॉय केल्याचं दिसून येत आहे.
-
बेबी शॉवरमध्ये प्रत्येक गोष्ट खास असण्याकडे लक्ष देण्यात आलं होतं.

२०१३ मध्ये अनिताने रोहितशी लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला ७ वर्ष झाली आहेत. -

काही मोजक्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या अनिताला खरी ओळख मालिकांमुळे मिळाली. 
'ये है मोहब्बत्तें', 'कभी सौतन कभी सहेली', 'काव्यांजली' अशा अनेक मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या.
INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन