-
सौंदर्य आणि अभिनय याचा संगम म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिकाचा आज वाढदिवस आहे.
-
दीपिका आणि तिचा नवरा रणवीर सिंग हे जोडपं नेहमी चर्चेत असतं. इंडस्ट्रीत पाठिमागे कुणीही 'गॉडफादर' नसताना या दोघांनी मेहनतीच्या बळावर स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
-
अलीकडेच दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केलेल्या पहिल्या चित्रपटाची पाचवी वर्षपूर्ती साजरी केली.
-
‘गोलियों की रासलीला- रामलीला’ हा दोघांचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट दोघांसाठी सुद्धा खास आहे. कारण याच चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या 'लव्ह स्टोरी'ला सुरुवात झाली.
-
प्रेमात पडण्याआधी विश्वास हा दीपिकासाठी गंभीर मुद्दा होता. रणवीरला पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा दीपिकासमोर प्रश्न होता.
-
रणवीर तिला आवडता होता पण तिला तिच्याबाजूने कोणतेही आश्वासन द्यायचे नव्हते.
-
"हा फक्त रणवीरचा विषय नव्हता. मी त्या नात्यासाठी तयार होते का, हा मुद्दा होता. त्या आधी मी काही रिलेशनशिप्समध्ये होते. प्रत्येकवेळी माझा विश्वासघात झाला होता."
-
"ज्यावेळी मी रणवीरला भेटले, त्यावेळी माझ्यात फार असा उत्साह नव्हता" असे दीपिकाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
"२०१२ मध्ये माझे प्रेमसंबंध तुटले, तेव्हा आता पुरे झाले अशी माझी भावना होती. मला तात्पुरत्या स्वरुपाचे डेटिंग करायचे होते."
-
"मला कोणाला बांधील रहायचे नव्हते. २०१२ मध्ये मी रणवीरला भेटले, त्यावेळी मी त्याला सांगितले, तू मला आवडतोस. पण मला हे नाते मुक्त ठेवायचे आहे."
-
"मला रिलेशनशिपसाठी कुठलेही आश्वासन द्यायचे नव्हते. मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित झाले, तर मी माझ्याबाजूने योग्य तो निर्णय घेईन" असे दीपिकाने सांगितले होते.
-
पण कालांतराने त्यांच्यातील प्रेमबंधाचे नाते अधिक दृढ झाले व नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर-दीपिका आयुष्यभरासाठी विवाह बंधनात अडकले.
-
१४-१५ नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…