-
अभिनय आणि व्यक्तीमत्वाच्या बळावर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर.
-
त्यांच्याकडे एक संवेदनशील अभिनेता म्हणून पाहिले जाते. पण याच नाना पाटेकरांच्या खासगी जीवनाबद्दल प्रेक्षकांमध्ये तितकीच उत्सुक्ता आहे.
-
बॉलिवूडमधल्या आपल्या करीअरमध्ये नाना पाटेकर यांचे नाव मनिषा कोईरालापासून ते आयेशा जुल्का या अभिनेत्रींसोबत जोडले गेले.
-
एककाळ बॉलिवूडमध्ये आयशा जुल्का आणि नाना पाटेकर यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. नाना पाटेकर विवाहित असूनही ते आयशा जुल्कासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
-
आयेशा जुल्का आणि नाना पाटेकर यांनी 'आंच' या सिनेमात एकत्र काम केले. या चित्रपटात दोघांनी काही बोल्ड दृश्ये दिली होती.
-
'आंच' च्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. नाना आयशा जुल्कासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे त्यावेळी बोलले जायचे. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.
-
नाना पाटेकर त्यावेळी आपल्या पत्नीसोबत राहत नव्हते. अभिनेत्री मनिषा कोईराला त्यांच्या आयुष्यात होती.
-
असे म्हटले जाते की, मनिषा कोईरालाने नाना पाटेकर आणि आयशा जुल्काला एकत्र एका खोलीत पाहिले होते. त्यानंतर तिने नाना पाटेकरांसोबत प्रेमसंबंध तोडले. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.
-
त्यावेळच्या मीडियामधील बातम्यांनुसार मनिषा आणि आयशामध्ये कडाक्याचे भांडण सुद्धा झाले होते.
-
मनिषा नानांच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर आयशा जुल्का नाना सोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे अफेअर बराच काळ चालले. (सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
काही वेळा नाना पाटेकरांचे वागणे खूप उग्र असते, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. नानाच्या वागण्याला कंटाळून अखेर आयशाने सुद्धा प्रेमसंबंध तोडले.
-
साल २००३ मध्ये आयशा जुल्काने बिझनेसमॅन समीर वाशीसोबत लग्न केले.
-
आयशा जुल्का आता वयाच्या पन्नाशीत पोहोचली आहे.
-
आयशा जुल्काला अभिनेता अक्षय कुमारसोबतच्या खिलाडी चित्रपटातून ओळख मिळाली.
-
तिने सुद्धा बॉलिवूडमध्ये काही हिट सिनेमा दिले व ९० च्या दशकात आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले.

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक