-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. मात्र, या लग्नसोहळ्यानंतर चर्चा रंगली ती अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांची. ( सौजन्य विराजस कुलकर्णी/ शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम पेज)

सिद्धार्थ-मितालीच्या लग्नात विराजस आणि शिवानीने एकत्र हजेरी लावली होती. 
विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला विराजस-शिवानी या दोघांनीही मॅचिंग कपडे परिधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. 
विराजस-शिवानी यांनी जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं नसलं तरीदेखील ते एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 
शिवानीने विराजससोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. -
१५ फेब्रुवारी २०२० मध्ये म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने Yup असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने हार्ट इमोजीदेखील टाकली होती. तेव्हापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

विराजसनेदेखील शिवानीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली. 
‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं. 
विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 
विराजस अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने अनेक प्रायोगिक नाटकं आणि चित्रपटांचं लेखन केलं आहे. 
सध्या तो झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. 
शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. 
शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. 
सध्या शिवानी 'सांग तू आहेस ना' या मालिकेत झळकत आहे.
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस