-
फेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले बुधवारी रात्री म्हणजे १० फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या आणि बहुचर्चीत असलेल्या मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्ट २०२०ची विजेता मानसा वाराणसी ठरली.
-
हैदराबादमध्ये जन्मलेली मानसा आर्थिक माहिती विनिमय विश्लेषक (फायनान्शियल इन्फॉर्मेशन एक्स्चेंज अॅनालिस्ट) आहे. अर्थविषयक माहिती जाणून घेणं तिला आवडतं.
-
मिस इंडिया ठरलेली मानसा वाराणसी ही २३ वर्षांची आहे. यापूर्वी तिने 'मिस तेलंगणा' हा खिताब जिंकला होता.
-
मिस इंडिया ठरल्याने आता २०२१ डिसेंबरमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये मानसा भारताचं प्रतिनिधित्तव करेल.
-
आई, आजी आणि धाकटी बहीण आयुष्यातील तीन सर्वात प्रभावी व्यक्ती असल्याचं मानसा म्हणते.
-
याशिवाय मानसा मिस वर्ल्ड २००० ची विजेता अभिनेत्री प्रियांका चोप्राला प्रेरणादायी मानते. प्रियंकाने नेहमीच कठोर मेहनत घेत विविध क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे, असं मानसा म्हणते.
-
Vasavi College of Engineering मधून मानसाने शिक्षण पूर्ण केलं असून तिला संगीत, योगा, निसर्गाची आवड आहे.
-
'मिस इंडिया' चा मान पटकावणारी ती तेलंगणामधील पहिली मुलगी ठरली आहे.
-
मानसासोबत खुशी मिश्रा, मान्या सिंह, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप ५ फायनलिस्ट होत्या.
-
मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते. फेमिना मिस इंडिया २०२०चे आयोजन मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
-
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाचा मिस इंडिया कॉन्टेस्ट ऑनलाईन आयोजीत करण्यात आला होता.
-
अभिनेत्री वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ति खुराणा आणि पुलकित सम्राट यांनी हजेरी लावली होती.
-
मिस इंडिया ज्युरी पॅनेलमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया, चित्रांगदा सिंह, पुलकित सम्राट आणि Falguni व Shane Peacock यांचा समावेश होता.
-
तर, हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे.
-
(सर्व फोटो मानसा वाराणसी इंस्टाग्राम अकाउंट) )

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL