-
प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आता पूर्वीसारखी चित्रपटांमध्ये सक्रिय नाहीय. पण तरीही तिची नेहमीच चर्चा असते. बॉलिवूडचा विषय निघाल्यानंतर रेखा हे नावचं चर्चेसाठी पुरेसे आहे.
-
रेखाने हिंदी चित्रपट सृष्टीवर स्वत:चा असा एक वेगळा ठसा उमटवलाय. त्यामुळे रेखाच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते.
-
रेखाने तिच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलचं पण त्याच बरोबर तिचं सौंदर्य, पडद्यावरच्या मादक अदांनी सुद्धा प्रेक्षकांना घायाळ केलं.
-
त्यामुळे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत तिचा मोठा चाहता वर्ग पसरला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा आज आयुष्याच्या वेगळया वळणावकर आहेत. पण आजही त्यांच्या प्रेमसंबंधांची तितक्याच चवीने चर्चा होते. (फोटो सौजन्य – वरिंदर चावला)
-
रेखाने आपल्या करीअरमध्ये सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. काही कलाकारांसोबतच्या तिच्या बोल्ड सीनची बरीच चर्चा झाली.
-
‘आस्था’मध्येच रेखाने उद्योगपती दाखवलेल्या नविन निश्चल सोबतही बोल्ड सीन दिले आहेत. चित्रपटाचा काळ लक्षात घेतला, तर त्या दृष्टीने ते सीन खूपच बोल्ड होते.
-
शशी कपूर यांच्या ‘उत्सव’ सिनेमात रेखा आणि शेखर सुमन यांचे अनेक बोल्ड सीन आहेत. या सीन्सची आजही चर्चा होते. शेखर सुमन रेखापेक्षा वयाने सात वर्षांनी लहान आहेत.
-
‘आस्था’ चित्रपटातील रेखाने रंगवलेली गृहिणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात तिने तिच्यापेक्षा वयाने चार वर्ष मोठया असलेल्या ओम पुरीसोबत बोल्ड सीन दिले. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
‘खिलाडियो का खिलाडी’ मध्ये लेडी डॉन रंगवणाऱ्या रेखाने तिच्यापेक्षा वयाने १३ वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारसोबत एका गाण्यात खूपट हॉट दृश्ये दिली होती. आजही या सीनची बरीच चर्चा होते.
-
मीरा नायरच्या ‘कामसूत्र’ सिनेमातही रेखा होती. या चित्रपटातील दृश्य तर त्यावेळी काळाच्या बरीच पुढे होती. रेखाने या सिनेमात कामसूत्रचे शिक्षण देणाऱ्या टीचरची भूमिका रंगवली आहे.

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..