-
महिला दिनाच्या निमित्तान 'तारिणी' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच एक नाव चांगलचं चर्चेत आलं आहे ते म्हणजे आरुषि निशंक. 'तारिणी' सिनेमातून आरुषि बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.नौदलातील सहा रणरागिणींचं शौर्य या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. मात्र या सिनेमामुळे चर्चेत आलेली आरुषि कोण ते जाणून घेऊया.
-
आरुषि ही केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मोठी मुलगी आहे. आरुषि एक शास्त्रीय नर्तक आणि पर्यावरणतज्ञ आहे. त्याचसोबत आरुषिने मॉडलींग केलंय.
-
महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षणासाठी ती सतत कार्यरत असते. तसचं ती वडिलांनी सुरु केलेल्या 'स्पर्श गंगा' या मोहिमेची संयोजक आहे. 2009 सालात गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती.
-
2015 सालात आरुषि अभिनव पंत यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. देहरादूनमधील हिमालयन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची ती अध्यक्ष आहे.
-
महिला दिनाच्या निमित्तानं घोषित करण्यात आलेल्या 'तारिणी' या सिनेमातून आयुषि बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सप्टेंबर 2017 मध्ये भारतीय नौदलातील 6 धडाकेबाज महिलांनी INS तारिणीवरुन जगभ्रमंतीचा प्रवास सुरु केला. मे 2018 मध्ये त्या प्रवास संपवून परत आल्या. या शूर महिलांचा प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.त्यातील एका महिलेच्या भूमिकेत आरुषि झळकणार आहे.
-
तर करोनाच्या काळात आरुषिने हजारो महिलांना सूती मास्क बनवण्यासाठी प्रोस्ताहन दिलं होतं. तिने या महिलांना मास्क बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. हे मास्क पोलीस आणि जवानांना मोफत देण्यात आले.
-
2017 सालात आरुषिला प्राईड ऑफ उत्तराखंड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
-
रोहित सुचंतीसोबत ती एका अल्बममध्येदेखील झळकणार आहे. आरुषिने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिलीय.
-
आरुषि सोशल मीडियावरदेखील चांगलीचं सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो ती पोस्ट करत असते.(all photo- instagram@arushi.nishank)

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष