-
'भाभी जी घर पर है' मालिकेत काम करणारी अभिनेत्री नेहा पेंडसे ही कायमच चर्चेत असते.
-
तिने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शार्दुल सिंह बयासशी लग्न केले.
-
शार्दुलचे यापूर्वी दोनदा लग्न झाले होते.
-
त्याला दोन्ही लग्नातून दोन मुले आहेत. त्यामुळे नेहाने त्याच्याशी लग्न करताच सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात होती.
-
पण आता नेहाने एका मुलाखतीमध्ये ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
-
नुकतीच नेहाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली.
-
नेहा म्हणाली, ट्रोलिंग हे कधीही न थांबणारे आहे. पण माझ्या पतीने मला याकडे दुर्लक्ष करण्यास शिकवले आहे.
-
पुढे नेहा म्हणाली, माझ्या पतीसाठी या सर्व गोष्टी नवीन होत्या. त्यामुळे लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगचा माझ्या नवऱ्यावर परिणाम होत होता. त्याला प्रचंड त्रास व्हायचा. पण आता तो देखील या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
-
या मुलाखतीमध्ये नेहाने तिच्या पतीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहे.
-
'लग्नाआधी मी आणि शार्दुल जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो. तसेच त्याचे हे तिसरे लग्न आहे आणि त्याच्या विषयी मला सगळं माहिती आहे' असे नेहा म्हणाली
-
५ जानेवारी रोजी २०२०मध्ये नेहाने प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंग बयासशी लग्न केले.
-
या लग्नसोहळ्याला नेहाने जवळच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले होते.
-
त्यांच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
नेहा ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
तिने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक