-
बॉलिवूडमधील फिट मम्मी अशी ओळख असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ग्लॅमरस आणि स्टायलीश लूकमुळे शिल्पा कायम चर्चेत असते. फिटनेससाठी शिल्पाचं कायमचं कौतुक केलं जातं.
-
शिल्पाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. लॉन्ग गुलाबी स्कर्ट आणि क्रॉप टॉप मधल्या या फोटोत शिल्पा उठून दिसतेय. शिल्पाच्या या फोटोला चाहत्यांनी तुफान लाईकस् दिले आहेत.
-
योगा क्विन अशी देखील शिल्पाची ओळख आहे. योगा आणि उत्तम डाएट सांभाळत शिल्पाने स्वत:ला मेन्टेन ठेवलंय. सुपर डान्सर या रियॅलिटी शो मध्ये शिल्पा सध्या परिक्षकाची धुरा सांभाळतेय. या शोच्या मंचावर शिल्पाचे वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत.
-
गेल्या काही दिवसात शिल्पाने काही खास स्टाइलच्या कपड्यांची निवड केल्याचं दिसतंय. यात विशेष करुन लॉन्ग स्कर्ट आणि ब्लाउज याची ती निवड करतेय. पिवळ्या रंगाच्या बांधणी स्कर्टमधील शिल्पाच्या लूकला देखील चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.
-
मोठ्या बांधणी प्रिंटच्या लाल गाउनमध्ये शिल्पाचा लूक अगदी उठून दिसतोय. या गाउनवरील बेल्ट तिच्या लूकची शोभा वाढवतोय.
-
गोल्डन कलरच्या ऑफ शोल्डर गाउनमधील शिल्पाचा ग्लॅमरस लूक घायाळ करणारा आहे. (Photo-instagram@shilpashetty)

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य