-
बॉलिवूड सिनेस्टार आपल्या फिट आणि परफेक्ट बॉडीसाठी ओळखले जातात. परंतु पडद्यावर दिसणारे हे कलाकार लहानपणापासूनच इतके फिट असतातच असे नाही. आज आपण अशा काही कलाकारांना पाहणार आहोत, जे आधी फार वेगळे दिसायचे आणि आता फार वेगळे दिसतात.
-
या यादीत सगळ्यात वरती नाव येत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचं. सारा बऱ्याच वेळा तिच्या फॅट टू फीटची कहानी सांगते. एवढचं नव्हे तर तिने अनेक वेळा तिचे आधीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. आज साराकडे पाहिल्यावर या आधी तिच वजन खूप होत असे वाटत नाही.
-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मोठा मुलगा जुनैदने आपलं वजन इतकं कमी केलं आहे की तो आता ओळखूही येत नाही.
-
दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंग्गत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर ही देखील तिच्या बहीनीसारखी फीट आहे. मात्र, या आधी खुशी एकदम वेगळी दिसायची. खुशीने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी देखील तिची लोकप्रियता जान्हवी पेक्षा कमी नाही आहे.
-
दिग्दर्शक बोनी कपूरचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूरच्या ट्रान्सफॉर्मेशनने ही सगळ्यांचे लक्ष वेधले होते. अर्जुनने याआधी त्याचे लहानपणीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी आलियाने तिचे वजन कमी केले होते.
-
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाचं नाव सुद्धा या यादीत आहे. सोनाक्षीने 'दबंग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सोनाक्षीचे आधीचे फोटो आणि आताचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. सोनाक्षी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची लाडकी लेक न्यासा आता मोठी झाली आहे. न्यासाचा आताचा फोटो आणि आधीचा फोटो बघितला तर न्यासाने स्वत:मध्ये खूप बदल केल्याचे दिसत आहे.
-
बॉलिवूड किंग खान शाहरूख खानची लेक सुहाना खान पॉप्युलर स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ करताना दिसते. सुहानाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिल्यावर लोकांना विश्वास होणार नाही.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?