-
-
राखीने शेअर केलेल्या तिच्या बालपणीच्या फोटोमंध्ये पहिलाच फोटो चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. राखी अवघ्या काही महिन्यांचं गोंडस बाळ असतानाचा हा फोटो आहे. 'किती गोड', 'खुपच सुंदर' अशा अनेक कमेंट य़ा फोटोला देण्यात आल्या आहेत.
-
या फोटोत राखीनं भगवं टी-शर्ट घातलंय. तर यात तिचे केस अगदी लांब सडक दिसत आहेत. यावेळी तिच्या डोक्यावर खोटे केस म्हणजेच गंगावन बसवल्याचं दिसतंय.
-
आईसोबतचा राखीचा बालपणीचा हा फोटो अनेकांच लक्ष वेधून घेतोय. यात राखीच्या आई सोफ्यावर बसलेल्या आहेत. तर चिमुकली राखी वॉकरमध्ये उभी आहे. राखीची आई कॅन्सरशी लढा देत असून काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील आईचा व्हिडीओ राखीने शेअर केला होता.
-
हे फोटो शेअर करताना राखीने खास कॅप्शन देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. "बालपणापासून आतापर्यतचा प्रवास.. मी खूप आनंदी आहे कि, मी लहानपणापासून अनेक चढउतार पाहिले. माझ्या बालपण्याच्या फोटोला प्रतिक्रिया नक्की द्या."असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
-
बालपणानंतर राखीने तिचे काही तारुण्यातील फोटो देखील शेअर केले आहेत. राखीला लहानपणापासूनच अभिनयाची, साजशृगांर करण्याची आवड होती. 10 वर्षांची असताना राखीने अनील अंबानी यांच्या लग्नात जेवण वाढण्य़ाचं काम केलं होतं. अनेक मुलाखतीत तिने ही आठवण सांगितली आहे.
-
-
-
-
बिग बॉस शोच्या 14 व्या पर्वात राखीने प्रेक्षकांच चांगलंच मनोरंजन केलं. या शोमथधून 14 लाख रुपयांची रक्कम घेऊ राखी घराबाहेर पडली. आईच्या उपचारांसाठी राखीने हा निर्णय घेतला.(photo-instagram@rakhisawant2511)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या