-
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असते. हटके फोटो पोस्ट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर साराचे रॉयल लूक मधील फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. साराने नुकतच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी फोटोशूट केलं आहे.
-
मनिष मल्होत्राच्या 'नुरानियत' या कलेक्शनसाठी साराने फोटोशूट केलंय. या फोटोशूटचे काही व्हिडीओ साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तर मनिष मल्होत्रानेदेखील साराचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोशूटमधील काही फोटोमध्ये साराने एक भरजरी काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं दिसतंय. काळ्या रंगाच्या या लेहंग्यावर सोनेरी आणि चंदेरी जरीकाम करण्यात आलंय. या लेहंग्यात साराचा थाट पाहण्यासारखा आहे.
-
यातील काही फोट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहेत. सर्वच फोटोत सारा सुंदर दिसत असून तिच्या या फोटोंवर चाहते घायाळ होत आहेत.
-
मनिश मल्होत्रा बॉलिवूडमधील नावाजलेला फॅशन डिझायनर असल्यानं सर्वच बड्या अभिनेत्रींना त्याच्यासाठी फोटोशूट करणं आवडत. साराचं हे खास फोटोशूट राजस्थानमध्ये करण्यात आलंय.
-
सारा अली खान लवकरत 'अतरंगी' या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (photo-instagram@manishmalhotra05)

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?