-
गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्युनंतर घराणेशाही हा शब्द सारखा आपल्या सगळ्यांसमोर यायचा. कोणताही कलाकार असो तो कोणत्या स्टारचा मुलगा-मुलगी असो किंवा चित्रपटसृष्टीच्या बाहेरून आलेली व्यक्ती, कोण कलाकार होणार हे सगळं प्रेक्षकांच्या हातात असते. कोणते स्टारकिड्स चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या आई-वडीलांसारखे नाव कमवू शकले नाही चला जाणून घेऊया…
-
अभिषेक बच्चन – बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला त्यांच्या एवढी लोकप्रियता मिळाली नव्हती. त्याचा पहिला हिट चित्रपट हा 'धूम' होता, त्याआधी अभिषेकचे सलग १५ पेक्षा जास्त चित्रपट फ्लॉप झाले होते. अभिषेक कितीही चांगला अभिनय करत असला तरी त्याला प्रेक्षकांकडून एवढं प्रेम मिळालं नाही. तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. (Photo credit : abhishek bachchan instagram)
-
हर्ष वर्धन कपूर – बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्यां मुलाचे नाव हर्ष वर्धन कपूर आहे. हर्ष वर्धनने 'मिर्झ्या' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंत त्याने 'भावेश जोशी' या चित्रपटात देखील काम केले. मात्र, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. (Photo credit : anil kapoor instagram)
-
रणधीर कपूर – रणधीर कपूर यांनी १९७१ मध्ये 'कल आज और कल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र त्यांना वडील राज कपूर इतकी लोकप्रियता मिळाली नाही. (Photo credit : randhir kapoor instagram)
-
राजीव कपूर – राजीव कपूर यांनी १९८३ साली 'एक जान हैं हम' या चित्रपटातून पदार्पण केले. राजीव कपूर हे देखील त्यांचा भाऊ रणधीर कपूर सारखेच बॉलिवूडमध्ये पाठी राहिले. त्यांना देखील लोकप्रियता मिळाली नाही.
-
बॉबी देओल – धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबीला देखील त्याच्या वडीलांइतकी लोकप्रियता मिळाली नाही. त्याला 'बरसात' आणि 'सोल्जर' या चित्रपटातून लोकप्रियता तर मिळाली होती. त्याने अनेक थ्रिलर चित्रपट केले. तो आता फक्त त्याच्या वडीलांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये दिसतो. मात्र, बॉबीला 'आश्रम' या वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळाली आहे. (Photo credit : bobby deol instagram)
-
तुषार कपूर – बॉलिवूड अभिनेते जीतेंद्र यांचा मुलगा तुषारचा 'मुझे कुछ कहना है', हा सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्यानंतर त्याने एकही हिट चित्रपट दिला नाही. मात्र, रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' या चित्रपटातून त्याला खरी पसंती मिळाली. (Photo credit : tusshar kapoor instagram)
-
करण देओल – अभिनेता सनी देओलच्या मुलाचे नाव करण देओल आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, तो लोकांची मने जिंकू शकला नाही. आता त्याचा दुसरा चित्रपट येणार आहे. 'अपणे २' हा त्याचा आगामी चित्रपट आहे. (Photo credit : karan deol instagram)
-
राहुल खन्ना- दिग्गज कलाकार विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अक्षय खन्ना यांचा भाऊ राहुल खन्ना आहे. राहुलने १९४७ मध्ये आमिर खान सोबत एका चित्रपटात काम केले होते. त्याने अनेक जाहिरातीही केल्या. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
-
संजय कपूर- संजय कपूर 'औजार' आणि 'सिर्फ तुम' या चित्रपटांतून प्रकाश झोतात आला. तरी आता त्याला लोक छोट्या छोट्या भूमिका करताना पाहतात. (Photo credit : sanjay kapoor instagram)
-
सिकंदर खेर – अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरला देखील त्याच्या वडीलां इतकी लोकप्रियता मिळाली नाही. (Photo credit : sikandar kher instagram)
-
उदय चोप्रा – बरेच दिवस सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर उदयला वाटले की आता आपण अभिनयात आपलं नशिब आजमावायला पाहिजे. उदयने २००० मध्ये 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यानंतर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूम 3' पर्यंत त्याला खूप कमी चित्रपटात पाहायला मिळालं. नंतर तर तो काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसला.
-
महाक्षय (मिमोह) चक्रवर्ती – महाक्षयने एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके चित्रपट केले आहेत. महाक्षय हा सुपरस्टार डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे.
-
हरमन बवेजा – हरमनने देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तरी सुद्धा त्याला लोकप्रियता मिळाली नाही.
-
फरदीन खान – स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान आहे. फिरोज खान यांनी 'प्रेम अगन' या चित्रपटातून फरदीनची बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. चित्रपट लोकप्रिय देखील ठरला. तरी देथील फरदीन लोकप्रियतेचं शिखर गाठू शकला नाही.

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’