-    गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका 'रात्रीस खेळ चाले ३' प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 
-    या मालिकेच्या तिसऱ्या पर्वात काही नव्या व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. 
-    या यादीमधील एक म्हणजे अभिरामची बायको. 
-    रात्रीस खेळ चाले आणि रात्रीस खेळ चाले २ या दोन्ही पर्वांमधली अभिरामची पत्नी देविका सर्वांनाच ठावूक होती. 
-    पण आता रात्रीस खेळ चाले ३ मध्ये कावेरी ही अभिरामची पत्नी दाखवण्यात आली आहे. 
-    कावेरीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 
-    कावेरी ही भूमिका अभिनेत्री भाग्या नायर साकारत आहे. 
-    तिने यूट्यूबवरील 'itsuch' या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. 
-    भाग्याने आजवर अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 
-    त्यानंतर तिला शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 
-    'क्षणिक' या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये तिने काम केले आहे. 
-    तिने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतलेले आहे. 
-    तसेच तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंगदेखील केले आहे. 
-    रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत ती मल्याळम शैलीत संवाद साधताना दिसत आहे. 
-    (all Photos: bhagya.nair instagram) 
 
  Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  