-
नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
-
रिंकू ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
नुकताच रिंकूने इन्स्टाग्रामवरील 'AskMeAnything' द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.
-
दरम्यान एका चाहत्याने तिला 'तुझा बॉयफ्रेंड आहे का?' असा प्रश्न विचारला होता.
-
यावर रिंकू काय उत्तर देणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.
-
चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देत रिंकूने 'नाही' असे म्हटले.
-
रिंकूने दिलेल्या उत्तरावरुन ती सिंगल असल्याचे दिसत आहे.
-
सध्या इन्स्टाग्रामवर रिंकूची ही पोस्ट चर्चेत आहे.
-
लवकरच रिंकू 'छूमंतर' या मराठी चित्रपटात भूमिका साकारणार आहे.
-
या चित्रपटाचे लंडन येथे चित्रीकरण सुरु आहे.
-
रिंकूसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
तसेच रिंकू नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटात देखील काम करणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
याशिवाय रिंकूचा आणखी एक चित्रपट येणार आहे.
-
या चित्रपटाचे नाव 'आठवा रंग प्रेमाचा' असे आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा