-    कलाकार हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. 
-    ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. 
-    नुकताच मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरीने चाहत्यांशी संवाद साधला आहे. 
-    तिने इन्स्टाग्रामवरील फिचर 'AskMeAnything' द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. 
-    तिने 'पुन्हा कर्फ्यू… घरात बसून कंटाळला आला… तुम्ही मला विचारा आणि मी ते पोस्ट करेन' असे म्हणत चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. 
-    त्यानंतर एका चाहत्याने तिला 'पार्टनर दिसायला कसा हवा?' असा प्रश्न विचारला आहे. 
-    त्यावर जुईने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
-    चाहत्याला उत्तर देत जुई म्हणाली, 'दिसणं महत्त्वाचं असतं का? हो.. पण जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे दिसता हे इतके महत्त्वाचे नसते.' 
-    जुईने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. 
-    दुसऱ्या एका चाहत्याने जुईला जर तुझा लाइफ पार्टनर मिळाला पण त्याला मांजर आवडत नसेल तर तू त्याच्याशी लग्न करशील का? असा प्रश्न विचारला होता 
-    त्यावर तिने 'असा पार्टनर शोधणारच नाही ना भाऊ' असे उत्तर दिले आहे. 
-    (All Photos : juigadkariofficial instagram) 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  