-
गेल्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपटगृह ही बंद होती. आता सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता होती की या वर्षी तरी त्यांना अनेक चित्रपट पाहायला मिळतील. सध्या ११ चित्रपट तयार असून त्यांची प्रदर्शनाची तयारी सुरू होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे बॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा या पुढे ठकलण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या वर्षीची नुकसान भरपाई तर त्यांना यंदाच्या वर्षी करता येणार नाही तर यंदाच्या वर्षीही चित्रपटसृष्टीला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट यंदाच्या वर्षी ही होणार नाही प्रदर्शित..
-
गेल्यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात काही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. मात्र, त्या चित्रपटांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. 'रुही' हा एकमेव चित्रपट सोडला तर इतर चित्रपट मोठ्या पडद्यावर कमाई करू शकले नाही.
-
लाल सिंह चड्ढा – बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट देखील अडकून राहिला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील १०० ठिकाणी झाले आहे. एवढंच नाही तर परदेशात ही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील अजून सांगण्यात आलेली नाही.
-
सुर्यवंशी – रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सुर्यवंशी' या चित्रपटाची वाट प्रेक्षक गेल्या वर्षभरा पासून करत आहेत. हा चित्रपट तर गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. करोनाच्या निर्बंधांमुळे हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला नाही. दरम्यान, हा चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार होता. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा चित्रपट आता देखील प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
-
थलायवी- बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतचा 'थलायवी' हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमाणामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ठकलण्यात आली आहे. याची माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक नोट शेअर करत दिली होती.
-
चेहरे – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट 'चेहरे' चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. हा चित्रपट ९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोनामुळे हा चित्रपट ९ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला नाही तर, 'चेहरे'च्या टीमने प्रेक्षकांची माफी मागितली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
-
राधे : यॉर मोस्ट वॉन्टेड भाई- बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'राधे : यॉर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या निर्बंधांमुळे याचे चित्रीकरण होऊ शकले नाही. म्हणून हा चित्रपट यंदाच्या वर्षी ईदला प्रदर्शित होणार होता. दरम्यान, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे जर लॉकडाउन करण्यात आले तर, हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होईल असे सलमानने सांगितले आहे.
-
83 – बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणचा '83' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि चित्रपटगृह बंद करण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. तर हा चित्रपट यंदाच्या वर्षी तरी प्रदर्शित होईल अशी उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली होती. तर त्यांच्या चाहत्यांना अजून काही दिवस थांबाव लागणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजून जाहिर करण्यात आली नाही. दरम्यान, हा चित्रपट १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारीत आहे.
-
शमशेरा – अभिनेता रणबीर कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' या चित्रपटाच मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर देखील अजून प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
-
भुज : द प्राइड ऑफ इंडिया – अभिनेता अजय देवगनचा 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आता मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामुळे निर्मात्यांना प्रचंड नुकसान होणार आहे. मात्र, आता परिस्थिती कधी सुधारणार या प्रश्नामुळे त्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे ठरवल्याच्या चर्चा आहेत.

Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’