-
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिना कोठारे हे सध्याच्या अतिशय लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आज १३ मे रोजी आदिनाथचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी…
-
'शुभमंगल सावधान' या चित्रपटासाठी आदिनाथचे वडील महेश कोठारे नवीन चेहऱ्याचा शोध घेत होते. त्यासाठी उर्मिला त्यांच्या घरी गेली होती.
-
आदिनाथ तेव्हा नुकताच झोपेतून उठला होता.
-
'झोपेतून उठताच उर्मिलाला समोर पाहिले आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो,' असं त्याने सांगितले होते.
-
नायिका म्हणून उर्मिलाचा तो पहिलाच चित्रपट होता आणि त्या चित्रपटात आदिनाथ सहाय्यक दिग्दर्शक होता.
-
सेटवर दोघांची चांगलीच ओळख झाली. त्याचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं.
-
चित्रपट पूर्ण झाल्यावरही दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. पण आदिनाथने तिला प्रपोज केलं नव्हतं.
-
पहिल्या डेटसाठी आदिनाथ-उर्मिला पुण्यात भेटले आणि लॉ कॉलेज रोडवरील कॅफे कॉफी डेमध्ये गेले.
-
त्यावेळी पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली होती.
-
कोसळणाऱ्या सरी, मधूनच वाहणारा वारा असे रोमँटिक वातावरण तयार झालं होतं.
-
अशा वातावरणात उर्मिलाची झालेली भेट, तिच्याशी मारलेल्या गप्पा यामुळे ते क्षण आदिनाथसाठी अविस्मरणीय ठरले
-
या भेटीनंतर मुंबईत आल्यावर आदिनाथने तिला प्रपोज केलं.
-
एकमेकांना बरीच वर्ष डेट केल्यावर २० डिसेंबर २०११ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
उर्मिलाविषयी आदिनाथ सांगताना म्हणाला होता, "उर्मिला अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच पण पत्नी म्हणून मला जास्त आवडते. आमची सर्वसामान्य माणसांप्रमाणे भांडणे होतात पण त्यातून चांगलंच निष्पन्न होतं. मुळात उर्मिला खूप प्रामाणिक आहे. एक जोडीदार म्हणून तिचा हाच प्रामाणिकपणा मला खूप भावतो."
-
दोघांच्या कामाच्या वेळा बऱ्याचदा जुळत नाहीत. पण, जेव्हा जुळतात तेव्हा ते क्षण दोघं खूप एन्जॉय करतात, असंही त्याने सांगितलं होतं.
-
दोघंही फूडी आणि ट्रॅव्हलर्स आहेत.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL