-
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानाचे असलेले वर्चस्व काही वेगळे सांगायला नको. या कुटुंबातून आलेला प्रत्येक व्यक्ती चित्रपटसृष्टीत चमकला आहे.
-
या कुटुंबातील मुलींना आधी चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र, हा पायंडा मोडीत काढत करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थानही मिळवले.
-
अत्यंत देखणी, हुशार आणि त्यात कपूर कुटुंबातून आलेली अभिनेत्री असल्याने तिच्या नावाची चांगलीच चर्चा असायची.
-
करिश्माचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
-
करिश्माच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटाबद्दल जेव्हा कधी चर्चा होती तेव्हा एका चित्रपटाचं नाव हमखास घेतलं जातं तो म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी’.
-
अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. मात्र दिल्लीचा व्यावसायिक संजय कपूर याच्याशी लग्न केल्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर राहिली.
-
लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं आणि नवीन प्रोजेक्ट्ससुद्धा नाकारले.
-
२००३ साली तिने संजय कपूर नामक एका व्यवसायिकासोबत लग्न केलं. मात्र तिचं लग्न दिर्घ काळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
-
करिश्माच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
-
सोशल मीडिया आणि काही वेबसाइट्सवर असलेल्या आकड्यांनुसार करिश्मा कपूरचं नेटवर्थ जवळपास ८७ कोटी आहे.
-
करिश्मा आता चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती बऱ्याच जाहिरातींमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
-
करिश्माला लग्झरी कार आवडतात.
-
करिश्माकडे मर्सिडीज-बेंझ एस-वर्ग, लेक्सस एलएक्स 470, मर्सिडीज बेंझ ई क्लास, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, ऑडी Q7 या कार आहेत.
-
अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : करिश्मा कपूर / इन्स्टाग्राम)

“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल