-
क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये जणू अतूट नाते निर्माण झाले आहे. बॉलिवूडमधील सौंदर्यवतींची भुरळ क्रिकेटपटूंवर पडत असल्याचे आपल्याला अनेकदा पाहावयास मिळाले. यामध्ये मन्सूर अली खान पतौडी- शर्मिला टागोर, विराट कोहली- अनुष्का, हार्दिक पांड्या-नताशा आणि इतर काही क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या यादीमधील अजून एक नाव म्हणजे कपिल देव आणि अभिनेत्री सारिका. पण त्या दोघांचे लग्न झाले नाही. चला जाणून घेऊया कपिल देव यांच्या लव्ह लाइफबद्दल..
-
'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा कपिल देव यांची पहिली भेट अभिनेत्री सारिकाशी झाली तेव्हा ते दोघे ही सिंगल होते.
-
अभिनेते मनोज कुमार यांच्या पत्नीमुळे सारिका आणि कपिल देव यांची भेट झाली होती.
-
त्यानंतर कपिल देव आणि सारिका यांच्या भेटी वाढू लागल्या होत्या. तसेच ते एकमेकांना आवडत असल्याचे म्हटले जात होते.
-
त्यावेळी कपिल देव आणि रोमी यांच्या नात्याला तडा गेला होता.
-
असे म्हटले जाते की कपिल देव आणि रोमी यांच्यामध्ये भांडण झाल्यामुळे कपिल देव हे सारिकासोबत वेळ घालवू लागले होते.
-
पण नंतर कपिल देव यांनी रोमी यांच्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतला.
-
काही दिवसांनंतर रोमी आणि कपिल देव यांनी लग्न केले.
-
तर दुसरीकडे सारिका यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांच्याशी लग्न केले.
-
पण काही दिवसांनंतर तिने घटस्फोट घेतला.
-
रोमी आणि कपिल देव यांची ओळख क्रिकेटपटू सुनिल भाटीया यांनी करुन दिली होती. सुनिल आणि कपिल देव हे एकदम जवळचे मित्र होते.
-
पहिल्याच भेटीत कपिल देव हे रोमी यांच्या प्रेमात पडले होते.
-
मात्र जवळपास एक वर्षानंतर १९८० मध्ये त्यांनी रोमी यांना प्रपोज केले.
-
त्यानंतर लगेच एक वर्षानंतर ते दोघे लग्नबंधनात अडकले.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक