-
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सुबोध भावेच्या लग्नाचा आज २० वा वाढदिवस आहे.
-
"लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता 'तू तिथे मी' इतकंच" असं कॅप्शन देत सुबोधने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेता सुबोध भावेने बालमैत्रीण मंजिरी हिच्याशी लग्न केलं.
-
२००१ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
सुबोधने पडद्यावर ज्याप्रमाणे खास भूमिका साकारल्या आहेत. तितकीत खास सुबोधची लव्ह स्टोरी आहे.
-
सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीचा उलगडा केलाय. अगदी कमी वयातच दोघांचं नातं बहरलं होतं.
-
सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.
-
साधारण १९९१ या सालातली ही गोष्ट आहे. यानंतर १० वीला असतानाच सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं.
-
तर मंजिरीने देखील हटके अंदाजात सुबोधला उत्तर दिलं.
-
एका मुलाखतीत ती म्हणाली, "मी सुबोधला म्हणाले की बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज.. त्यानंतर मी त्यावेळेला पुलावर गेले.. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं"
-
सुबोध आणि मंजिरी ३० वर्षांपासून सोबत आहेत.
-
या दोघांना मल्हार आणि कान्हा ही दोन मुलं आहेत.
-
सुबोधवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सुबोध आणि मंजिरीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुबोध भावे आणि मंजिरी भावे / इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”