-
रक्ताने माखलेला शर्ट, शून्यात नजर लावून डोक्याला हात लावून खुर्चीवर बसलेली ही व्यक्ती सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चेत आहे. या फोटोवर सर्वजण चिंता व्यक्त करण्याऐवजी हसतायत कारण आहे या फोटोची कॅप्शन आणि पोस्टमधील दुसरा फोटो…
-
तर हा फोटो पोस्ट केलाय झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेतील मुख्य कलाकार असणाऱ्या विराजस कुलकर्णीने. 'माझा होशील ना' या मालिकेने मराठी प्रेक्षकांच्या घरात आणि मराठी वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
-
माझा होशील ना मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर गारुड केल्याचं पहायला मिळतं आहे.
-
ही मालिका टीव्हीबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही चांगलीच चर्चेत असते ती या मालिकेतील कलाकारांमुळे.
-
मालिकेमध्ये गौतमी देशपांडेने साकारलेली सई आणि विराजस कुलकर्णीने साकरलेल्या आदित्य देसाईची पात्रं प्रेक्षकांच्या फारच पसंतीस पडली आहेत.
-
आदित्य आणि सई म्हणजेच गौतमी आणि विराजसने अल्पावधीमध्ये आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय.
-
अभिनेता विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. विराजस अनेकदा फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. बऱ्याचदा तो सेटवरील फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर करतो.
-
अभिनेता विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. विराजस अनेकदा फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. बऱ्याचदा तो सेटवरील फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर करतो.
-
नुकतेच विराजसने सेटवरून काही फोटो शेअर केले असून त्याला मजेदार कॅप्शन दिलीय. विराजसच्या या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
-
विराजसने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो खुर्चीवर बसलेला दिसत असून त्याच्या शर्टाची एक बाजू रक्ताने माखलेली दिसत आहे.
-
अर्थात हे शुटींगसाठी वापरण्यात आलेला मेकअपचा कमाल आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
-
तर हा एक रक्ताने माखलेला फोटो या पोस्टमध्ये दिसत असली तरी पोस्टमधील दुसऱ्या फोटोमध्ये विराजस नवरदेवाच्या वेशात खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे.
-
विशेष म्हणजे दोन्ही फोटोमध्ये कपडे आणि परिस्थिती वेगवेगळी असती विराजस डोक्याला हात लावून बसल्याचं दिसत आहे.
-
"MBA चा टॉपर होता. सई आयुष्यात आली आणि…"; अशी मजेदार कॅप्शन विराजसने या मालिकेतील कथानकाचा संदर्भ देत दिलीय.
-
हे फोटो आणि कॅप्शन वाचून अनेकांनी स्मायलीज पोस्ट करत पोस्ट मजेदार असल्याचं सांगितलंय.
-
या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. या फोटोवर आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत.
-
या पूर्वीही विराजसने अशाप्रकारच्या क्रिएटीव्ह कॅप्शन फोटोंना दिल्याचं पहायला मिळालं आहे.
-
म्हणजे आता हा वरचा फोटो पाहा. हा शेअर करताना त्याने सहकलाकार उंचीने कमी असल्यावर अशापद्धतीने उभं राहून उंचीमधील फरक कमी करत शुटींग करावं लागतं असं विराजस म्हणाला होता. तसेच अशा पोजमध्ये भावना कशा व्यक्त होणार असंही त्याने विचारलं होतं.
-
हा फोटो शेअर करताना विराजसने फोटोत डेड दिसत असलो तरी संध्याकाळी लाइव्ह येतोय असं कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.
-
या फोटोला लग्नाची बेडी अशी कॅप्शन विराजसने दिलेली.
-
विराजस आणि गोमती सेटवरही धम्माल मस्ती करताना दिसतात.
-
विराजस सेटवरील अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना दिसतो.
-
यामुळेच ही जोडी मालिकेबरोबरच नेटकऱ्यांच्याही पसंतीची जोडी झालीय.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम