-
अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी मागील सोमवारी अटक केली. तेव्हापासून कुंद्रा हे चर्चेत आहेत. (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडियावरुन साभार)
-
आजच म्हणजेच २७ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे.
-
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यामध्ये मढ येथील एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये पॉर्न चित्रपटांचं शुटींग सुरु असल्याचं उघडकीस आलं. त्याच प्रकरणात कुंद्रांविरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
-
कुंद्रा यांच्या अटकेनंतर त्यांच्यासोबतच शिल्पा शेट्टीसंदर्भातही वृत्तपत्रांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच चर्चा सुरु असल्याचं दिसतय. त्यांची संपत्ती, घर यासंदर्भातही बरीच चर्चा होताना दिसतेय.
-
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना दोन मुलं आहेत. वियान कुंद्रा आणि मुलगी समिषासोबत हे दोघे मुंबईमधील जूहूतील एका आलीशान घरामध्ये राहतात.
-
कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीच्या घराप्रमाणेच मुंबईमधील हे घरही अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे.
-
त्याचबरोबर कुंद्रा यांनी दुबईमध्येही एक आलीशान बंगला घेतलाय. या बंगल्यामध्येही अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. पाहुयात याच बंगल्याचे काही खास फोटो
-
दुबईजवळच्या एका बेटावर शिल्पा आणि राज यांनी हे व्हेकेशन होम घेतलं आहे.
-
शिल्पा आणि राज या दोघांनाही महागड्या लाइफस्टाइलची सवय आहे. राज कुंद्राही अनेकदा पत्नीच्या इच्छेप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात असं त्यांनी मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याच अलिशान गोष्टींमध्ये दुबईतील या घराचाही समावेश होतो.
-
या घरामध्ये खासगी जीम, स्विमिंग पूल, गार्डन एरिया आणि इतर सुविधा आहेत. शिल्पा अनेकदा या घराचे फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करताना दिसते.
-
शिल्पा आणि राज यांच्या लग्नाना २०१० मध्ये एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज यांनी जगातील सर्वात उंच इमारत असणाऱ्या बुर्ज खलीफामध्ये एक आलीशान प्लॅट आपल्या पत्नीला गिफ्ट केला.
-
बुर्ज खलीफामधील या फ्लॅटची किंमत ५० कोटी रुपये इतकी होती असं सांगण्यात येतं. मात्र हा फ्लॅट अजूनही शिल्पाकडे आहे की नाही याची माहिती उपलब्ध नाही. २०१५ मध्ये हा फ्लॅट विकल्याची माहिती समोर आलेली मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता.
-
दुबईमधील सर्वात महागड्या ठिकाणी शिल्पा आणि राज यांचा हा बंगला आहे. पाम जुमेराह परिसरामध्ये हा बंगला आहे. अनेकदा शिल्पा आणि राज सुट्ट्यांमध्ये या बंगल्यावर वास्तव्यासाठी येतात. हा दुबईमधील सुट्ट्यांदरम्यान शिल्पाने पोस्ट केलेला त्यांच्या बंगल्यातील फोटो आहे.
-
दुबईबरोबरच शिल्पाला लंडनमध्ये रहायलाही फार आवडतं. शिल्पासाठी राज कुंद्रांनी लंडनमध्येही एक घर विकत घेतलं आहे. या फ्लॅटची किंमत ७ कोटी रुपये इतकी असल्याचे समजते.
-
शिल्पा शेट्टीच्या नावे मुंबईमध्ये दोन मोठे रेस्तराँ सुद्धा आहेत. यामधून त्यांची वर्षाला कोट्यावधीची कमाई होत असल्याचं सांगितलं जातं.
-
नुकताच शिल्पा आणि राज यांनी मुंबईतील वरळीमध्ये बॅस्टीयन चैन नावाचं एक रेस्तराँ सुरु केलं आहे. याचे फोटोही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेले.
-
दुबईमधील बंगल्यामध्ये एक मोठा बार एरिया आणि स्विमिंग पूल आहे. या फोटोकडे पाहिल्यानंतर हा बंगला किती भव्य आणि आलिशान आहे याचा अंदाज बांधता येतो.
-
विशेष म्हणजे हा बंगला समुद्र किनाऱ्यावर आहे.
-
म्हणजे या बंगल्याच्या लॉनमधून थेट समुद्रकिनाऱ्यावर जाता येतं.
-
राज आणि शिल्पा यांचा जुहूमधील बंगलाही दुबईच्या बंगल्याइतकाच आलीशान आहे.
-
शिल्पा बऱ्याच वेळा योगाचे व्हिडीओ बंगल्यामधील गार्डनमध्येच शूट करते.
-
योग करण्यासाठी शिल्पा आणि राजच्या मुंबईतील बंगल्यात एक खास जागा आहे.
-
शिल्पाने मुंबईतील घराच्या गार्डनमध्ये भाज्या लावल्या आहेत.
-
त्याच्या मुंबईतील घरात जीम, मोठे गार्डन, थिएटर असल्याचे दिसत आहे.
-
मात्र त्याचवेळी निवांतपणा असावा म्हणून घराला जिथे जिथे शक्य आहे तिथे पॅनरोमा व्ह्यू असणाऱ्या बाल्कनीही आहेत.

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”