-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
-
या प्रकरणी अभिनेत्री, मॉडेल शर्लिन चोप्राने सर्वात पाहिले जबाब नोंदवला.
-
या जबाबात शर्लिनने राजविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
-
'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९मध्ये राजने शर्लिनच्या मॅनेजरशी संपर्क केला होता.
-
त्यानंतर २७ मार्च २०१९ रोजी मीटिंग झाल्यानंतर एका टेक्स्ट मेसेज वरून झालेल्या वादानंतर राज अचानक शर्लिनच्या घरी आला होता.
-
घरी आल्यानंतर शर्लिनने नकार दिल्यानंतरही राज तिला किस करत होता असे शर्लिन म्हणाली.
-
'मला कोणत्याही विवाहीत पुरुषाशी संबंध ठेवायचे नव्हते' असे शर्लिन राजला म्हणाली.
-
त्यावर उत्तर देत राज शर्लिनला म्हणाला, 'माझे आणि शिल्पाचे संबंध ठीक नाहीत, आमच्यात वाद सुरू आहेत.'
-
पुढे शर्लिन म्हणाली, 'मी राजला थांबवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने मी घाबरले आणि राजला धक्का देऊन बाथरुममध्ये पळाले.'
-
राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची ही चौकशी केली होती.
-
राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन अर्ज मुंबईच्या कोर्टाने फेटाळला आहे. यापूर्वी मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पैसाच पैसा! ५० वर्षानंतर सूर्याच्या राशीमध्ये निर्माण होईल त्रिग्रही योग, कोणाचे पालटणार नशीब अन् कोणाची होणार प्रगती, जाणून घ्या