-
करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोहिम हाती घेणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा आज वाढदिवस. “शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे,” असं सांगणारा सोनू तसा मागील वर्षभरापासून त्याच्या या समाजकार्यासाठी चर्चेत आहे. सोनूने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत त्याने हजारो मुजरांना आपल्या राज्यामध्ये परत पाठवलं आहे. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूने केलेल्या मदतीची जाण ठेवत घरी सुखरुप पोहचलेल्या अनेक मजुरांनी त्याचे आभार मानले आहेत. सोनू कामगारांना बसने घरी पाठवण्याबरोबरच ते घरी पोहोचेपर्यंत त्यांच्या जेवणाचा खर्चही उचलला आहे. मात्र अनेकांना स्वत:च्या घरी पाठवणार सोनू स्वत: दोन-अडीच दशकांपूर्वी मुंबईत दाखल झाला होता. सोनूने नुकतेच मुंबईमध्ये एक फोर बेडरुम किचन हॉल म्हणजेच 4 BHK घर विकत घेतलं आहे. चला तर पाहुयात कसं आहे त्याचं हे घर… (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूनेच २१ फेब्रुवारी २०२० रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन आपल्या नवीन घराबद्दलची माहिती दिली होती. "माझे आणि माझ्या बहिणीचं स्वप्न पुर्ण झालं," असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूने मुंबईमधील अंधेरी भागातील युमाननगरमध्ये (लोखंडवाला) फोर बीएचके फ्लॅट घेतला आहे. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
या घराचा एरिया २ हजार ६०० स्वेअर फूट इतका असून त्यामध्ये सोनू आणि त्याच्या घरच्यांनी अगदी सुंदर इंटेरियर करुन घेतलं आहे. आपण या घराच्या कामाबद्दल समाधानी असल्याचं सोनूने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूच्या घरातील डायनिंग टेबलचा एरिया. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
अंधेरी परिसराबद्दल सोनूला विशेष प्रेम आहे हे त्याच्या बोलण्यामधूनच समजते. "मी मागील अनेक वर्षांपासून अंधेरीमध्ये राहत आहेत. माझे अनेक मित्रही अंधेरीमध्येच राहतात. मी माझ्या करियरची सुरुवात होण्याच्या आधीपासून याच परिसरामध्ये राहिलो आहे," असं सोनू अंधेरीबद्दल बोलताना एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता. (फोटो सौजन्य: सोनू सूद फेसबुक)
-
सोनूनच्या प्रशस्त घरामधील हा लिव्हिंग रुमचा एरिया. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूने आपल्या घराची रचना वास्तू शास्त्राप्रमाणे करुन घेतली आहे. त्याने आपल्या घरातील अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
घरामधील बेडरुमचा हा फोटो पाहूनच बेडरुम किती मोठा आहे याचा अंदाज बांधता येतो. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम) -
"माझी जीम, मुलांच्या शाळा, चांगली हॉटेल असं सारं काही याच परिसरात असल्याने मी येथेच घर घेण्याचा निर्णय घेतला," असंही सोनूने अंधेरीमधील घरासंदर्भात बोलताना म्हटलं होतं. सोनू अनेकदा त्याला भेटायला आलेल्या विशेष चाहत्यांचे स्वत:च्या घरी स्वागत करतो आणि त्यांचे फोटो शेअर करत असतो. (फोटो सौजन्य: सोनू सूद फेसबुक)
-
सोनूच्या घरातील बाल्कनीमधून रात्री दिसणारी मुंबई… (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूनेच त्याच्या घरातील पोस्ट केलेला हा आणखीन एक फोटो (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूने १९९६ साली सोनालीशी लग्न केलं. या दोघांना आयन आणि इशान ही दोन मुले आहेत. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)
-
सोनूचे कुटुंब मूळचे पंजाबमधील मोगा येथील असून तिथेही त्यांचे मोठे घर आहे. ही पाहा त्याच्या घरासमोरील लॉनची झलक. (फोटो सौजन्य: सोनू सूद इन्स्टाग्राम)

“पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून RSS बद्दल खोटं बोलले”, काँग्रेसचा घणाघात