-
अभिनेत्री सई ताम्हणकरने क्रिती सेनॉन सोबतचा एक खास फोटो शेअर केलाय. हा फोटो 'मीमी' सिनेमाच्या सेटवरचा आहे. या सिनेमात क्रिती आणि सईमध्ये घट्ट मैत्री दाखवण्यात आलीय. हा फोटो शेअर करत सईने 'फ्रेण्डशीप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo-instagram@ saietamhankar)
-
तर अमृता खानविलकर आणि अभिनेत्री सोनाली खरे यांच्या मैत्रीबद्दल अनेकांना कल्पना आहे. दोघी खास मैत्रिणी आहेत. अमृताने सोनालीसोबचा फोटो शेअर केलाय. (Photo-instagram@ amrutakhanvilkar)
-
तसंच अमृता खानविलकरने पती हिमांशु मल्होत्राचा फोटो तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर करत त्याला देखील 'फ्रेण्डशीप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नापूर्वी अमृता आणि हिमांशु बेस्ट फ्रेण्डस् होते. (Photo-instagram@ amrutakhanvilkra)
-
अभिनेत्री मानसी नाईकने देखील अभिनेत्री दिपाली सय्यदसोबत एक खास फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने मेत्रीवरील कविता देखील शेअर केलीय. "मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!,या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत, जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत, कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही….." (Photo-instagram@ manasinaik0302)
-
तर अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या फ्रेण्डस् गँगसोबतचा एक खास फोटो शेअर केलाय. (Photo-instagram@ mitalimayekar)
-
अभिनेत्री अभिज्ञा भावेने एक फोटो शेअर करत 'फ्रेण्डशीप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo-instagram@ abhidnya.u.b)
-
भार्गवी चिरमुलेने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या खास मैत्रिणी अभिनेत्री श्वेता शिंदे आणि तेजा देवकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Photo-instagram@ bhargavi_chirmuley)
-
'मुलगी झाली हो' या मालिकेतील शौनक म्हणजेच अभिनेता योगेश सोहनीने मित्र मैत्रिणींसोबतचा खास फोटो शेअर करत 'फ्रेण्डशीप डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. "युष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर, मित्र मैत्रिणींच्या "टोळ्या" घेऊन जगायच असतं.माझ्या आयुष्यात असलेल्या आणि या पुढेही येणाऱ्या तमाम मित्र-मैत्रिणींना हॅपी फ्रेण्डशीप डे" असं तो कॅप्शनमध्ये म्हणाला आहे. (Photo-instagram@ yogeshsohoni)
-
अभिनेता प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसोबतचाच एक फोटो शेअर केलाय. "बेस्ट फ्रेण्ड फॉरएव्हर" असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलंय.(Photo-instagram@ oakprasad)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग