-
९० च्या दशकामध्ये खलनायक म्हणून मोठा पडदा गाजवणारे अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
तशी श्रद्धा अनेक कारणांने सतत चर्चेमध्ये असते.
-
कधी मालदीवमधील सुट्ट्यांचे फोटो पोस्ट केल्याने ती चर्चेत असते.
-
तर कधी साडीमधील मराठमोळ्या लूकमधील फोटो पोस्ट केल्याने श्रद्धा चर्चेत असते.
-
श्रद्धाची लोकप्रियता इतकी आहे की ती कुठेही गेली तरी तिचे चाहते आणि प्रसारमाध्यमांचे फोटोग्राफर तिची एक झलक टीपण्यासाठी वाट पाहत असतात.

मात्र याच फोटोग्राफर्सपैकी काहींनी श्रद्धाचे असे काही फोटो काढलेत की ज्यामधून एक वेगळीच माहिती समोर आलीय. -
नुकत्याच एका चित्रपटाच्या सेटवरुन बाहेर पडताना श्रद्धाचा सामना मीडियाशी झाला.
-
श्रद्धा नेहमीप्रमाणे फार सुंदर दिसत होती.
-
फोटोग्राफर समोर आले तेव्हा श्रद्धा मोबाइलवर कोणाशी तरी काहीतरी बोलत होती. मात्र फोटो क्लिक केले जात असल्याचं समजल्यानंतर तिने लगेच चॅटींग बंद केलं.
-
मात्र चॅटींग बंद केलं तरी ती स्क्रीनलॉक करायला विसरली आणि तिचे पर्सनल चॅट या फोटोंमध्ये कैद झालेत.
-
श्रद्धाने तिच्या मोबाइलमध्ये नावाऐवजी तीन हार्ट इमोंजी वापरुन सेव्ह केलेल्या एका क्रमांकवरील व्यक्तीशी मेसेजिंग अॅपवरुन गप्पा मारत होती.
-
"मी यापूर्वी तुझ्यासारख्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात भेटलेले नाही. काहीही झालं तरी तू माझ्या सोबत असतोस", असा मेसेज श्रद्धाने या व्यक्तीला पाठवलाय. यावर समोरच्या व्यक्तीने, "मला आनंद आहे की तुला असं वाटतं."
-
पुढे श्रद्धा लिहिते की, "तू खरोखरच माझं म्हणणं ऐकून घेतो. खरं तर असं कोणी करत नाही. तू नेहमीच मला चांगलं वाटवं असा प्रयत्न करतो," असं म्हटलंय. त्यावर समोरुन हार्ट इमोजीने रिप्लाय आलाय.
-
"माझी सगळी स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी धन्यवाद," असंही पुढे श्रद्धा म्हणते. "हे माझं भाग्य आहे, कधीही काहीही लागलं तर मला सांगत जा," असं समोरुन ती व्यक्ती रिप्लाय करते.
-
मात्र अनेकांनी हे फोटो खोटे असल्याची शंका व्यक्त केलीय.
-
फोटो एडीटींगच्या मदतीने हे चॅट तयार करण्यात आल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
-
एक नाही तर अनेकांनी हे चॅट खोटे असल्याची शंका व्यक्त केलीय.
-
एडीटींग कुठून केली असं काहीजण विचारत आहेत.
-
हे डिलीट करा असं काहींनी म्हटलं आहे.
-
श्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात.
-
श्रद्धा कपूर ही फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात.
-
सध्या चर्चेत असणारे हे फोटो रोहनसोबतच्या चॅटचे आहेत की इतर कोणाच्या याचं उत्तर तर श्रद्धाच देऊ शकते.
-
दिग्दर्शक लव्ह रंजनच्या आगामी चित्रपटामध्ये श्रद्धा झळकणार आहे.
-
मात्र चित्रपटांऐवजी सध्या श्रद्धा या व्हायरल चॅटमुळे चर्चेत आहे. (सर्व फोटो : ShraddhaKapoor आणि manav.manglani इन्स्टाग्रामवरुन साभार)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक