-
अभिनयासोबतच अमृता खानविलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनयासोबतच अमृताला नृत्य आणि योगाची देखील आवड आहे.
-
सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ असणाऱ्या या अभिनेत्रीच्या नृत्याविष्काराचेही अनेक चाहते आहेत.
-
मागील काही महिन्यांपासून अमृता सोशल मीडियावर 'अमृतकला' अंतर्गत तिच्या अप्रतिम नृत्याचे व्हिडीओज शेअर करत होती. त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
-
या प्रेमामुळेच अमृताने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.
-
अमृताने अधिकृतरित्या स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु केले असून ते आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
-
आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आवडत्या जागा, पदार्थ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते.
-
अमृताने हाच नजराणा आपल्या चाहत्यांसाठी खास आणला आहे.
-
यात अमृताचा सकाळचा दिवस कसा सुरु होतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती काय करते, तिचा डाएट काय हे ती चाहत्यांसोबत शेअर करणार आहे.
-
त्यासोबतच अमृताला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात, कुठे फिरायला, शॉपिंगला आवडते, आईसोबत ती कसा वेळ घालवते हे देखील या व्हिडीओमधून चाहत्यांना कळेल.
-
एकंदर तिचे लाइफस्टाईल, तिच्या आवडीनिवडी, नृत्य, अभिनय अशा तिच्यासंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा यात होणार आहे
-
आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' खरं सांगायचे तर 'अमृतकला'ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु कारण्यासाठी अधिक प्रेरित झाले. "
-
पुढे अमृता म्हणली, "मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच."
-
सुरुवातीला अमृता महिन्याला चार ते पाच व्हिडीओ शेअर करणार आहे.
-
अमृता अनेकदा तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
तसचं योगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अमृता योग करण्यासाठी चाहत्यांना प्रोत्साहन देते. (All Photo-Instagram@amrutakhanvilkar)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक