-
अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना त्यांच्या बोल्ड कपड्यांमुळे लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागल्याचं आपण पाहिलं आहे. अत्यंत बोल्ड कपडे परिधान केल्याने या मॉडेल्सना काही वेळा कॅमेरासमोर वावरणं कठीण होतं.
-
असंच काहीसं प्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिच्यासोबतदेखील घडलं आहे.
-
विविध फिल्म फेस्टिल्हलमध्ये अमेरिकन मॉडेल असलेल्या बेलाचा बोल्ड लूक अनेकांचं कायमच लक्ष वेधून घेतो. यात खास करून कान्स फिल्म फेस्टिव्हल.
-
मात्र २०१६ सालामध्ये कान्स फेस्टिव्हलसाठी परिधान केलेल्या ड्रेसमुळे बेलाला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला होता. या ड्रेसमुळे आपल्याला लाजीरवाणं वाटल्याचा बेलाने स्वत: खुलासा केला आहे.
-
बेलाने नुकतीच 'वोग' या प्रसिद्ध मासिकाला मुलाखत दिली असून या मुलाखतीत तिने २०१६ सालामध्ये कान्स फेस्टिव्हलमध्ये परिधान केलेल्या लाल रंगाच्या गाऊनबद्दल खुलासा केला आहे.
-
बेलाने २०१६ सालामध्ये कान्स फेस्टिव्हसाठी अलेक्झांडर व्हॉथियर या फॅशन डिझायनरने डिझाइन केलेला लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
डीप नेक असलेल्या या गाऊनला कमरेपर्यंत साईड स्लिट होती.
-
या गाऊनमध्ये बेला खूपच मादक दिसत होती. हा ड्रेस परिधान केल्यानंतर बेला खूपच नर्वस असल्याचं तिने वोगला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे.
-
बेला हदीद म्हणाली, "मला आजही ते क्षण आठवून लाजीरवाणं वाटतं. हा ड्रेस तसा खूप सुंदर होता. मात्र तो माझ्या टाइपचा नव्हता." असं बेला म्हणाली.
-
बेलाने परिधान केलेल्या या बॅकलेस आणि साईड स्लिट असलेल्या गाऊनमध्ये तिची बॉडी एक्सपोज होत होती.
-
पुढे ती म्हणाली, " मी या ड्रेसमुळे नर्वस होते. मी खूपच मादक दिसत होते. सगळीकडे कॅमेरा, माझा साईड स्लिटवाला ड्रेस आणि भरपूर मेकअप यामुळे मी थोडी उदास होते." असं बेला म्हणाली.
-
सुदैवाने तेव्हा वॉर्डरोब मालफंक्शन झालं नाही यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजत असल्याचं बेला म्हणाली.
-
२०२१ सालामधील कान्स फेस्टिव्हलमध्ये देखील बेला हदीदीने लक्ष वेधून घेतलं होतं.
-
यावेळी बेलाने एक काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये बेलाची ब्रेस्ट तिने गळ्यात घातलेल्या एका गोल्डन नेकलेसने झाकण्यात आली होती.
-
बेलाचा हा लूक देखील चांगलाच चर्चेत आला होता. (All Photo- Instagram@bellahadid)
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक