-
प्रत्येक सणाला बॉलिवूडमधील गाण्यानी चार चांद लागतात त्याचप्रकारे स्वतंत्र्यदिनाच्या निमित्तानेदेखील बॉलिवूडमधील अनेक देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते.
-
केसरी (२०१९): तेरी मिट्टी -अक्षय कुमारच्या 'केसरी' या सिनेमातील 'तेरी मीट्टी' हे गाणं एका सैनिकाच्या मनात असलेल्या देशप्रेमाचं वर्णन करणारं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे.
-
राजी (२०१८): 'ऐ वतन'- 'राजी' सिनेमातील 'ऐ वतन' हे गाण दोन व्हर्जनमध्ये ऐकायला मिळत. अरिजीत सिंह आणि सुनिधी चौहान दोघांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे.
-
उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९): मे लढ जाना- विकी कौशलचा लोकप्रिय ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक ' या सिनेमातील 'मे लढ जाना' या गाण्यात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांची मेहनत पाहायला मिळते.
-
मणिकर्णिका (२०१९): विजय भव- मणिकर्णिका सिनेमातील विजय भव हे गाणं देखील झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या विजयाची गाथा सांगणार आहे. प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे.
-
परमाणू( २०१८)- 'थारे वासते'- सिनेमातील या गाण्यात भारतीय नौदलाला एक मोहिमेदरम्यान आलेल्या अडचणींचं चित्रण करण्यात आलंय. दिव्याकुमार खोसलाने गायलेलं हे गाणं सचिन जीगरने संगीतबद्ध केलंय.
-
एअरलिफ्ट (२०१६)- 'तू भूला जैसै'- एअरलिफ्ट या सिनेमातील या गाण्यात अडचणींच्या काळात भारतीयंमध्ये असलेल्या एकीचं चित्रण करण्यात आलंय. या गाण्याच्या शेवटी असलेले 'वंदे मातरम्' हे बोल ह्रदयाला भिडणारे आहेत.

बापरे! मुंबईकरांनो दादरला खरेदीला जाताय? थांबा… ‘हा’ धक्कादायक VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल