-
अभिनेत्री रिंकू राजगुरुची आता केवळ आर्ची म्हणून ओळख न राहता हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
मराठी सिनेमांनतर 'हंड्रेड' आणि 'अनपॉझ्ड' या वेब सीरिजनंतर 'हल्ला २००' या हिंदी सिनेमातून रिंकू एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.
-
या सिनेमात रिंकू दलित समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका निर्भीड तरुणीची भूमिका साकारतेय.
-
रिंकू सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.
-
वेगवेगळे फोटो शेअर करत ती चाहत्याचं लक्ष वेधून घेत असते.
-
नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत रिंकू खूपच सुंदर दिसतेय.
-
या फोटोत रिंकूने बेज कलरच्या पॅन्टवर एक ब्रालेट परिधान केलंय. तर एक शर्ट जॅकेटप्रमाणे तिने घातलं आहे.
-
"दोन सेकंदांसाठी विचार करणं थांबवा आणि आयुष्यात जे समोर आलंय त्याचा आनंद लुटा" अशा आशयाचं सुंदर कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलंय.
-
रिंकूने या फोटोंमध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन दिले आहेत.
-
चाहत्यांकडून तिच्या फोटोंना मोठी पसंती मिळतेय. (All Photo-Instagram@iamrinkurajguru)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी