-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते.
-
अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना ही भूमिका साकारत आहे.
-
अभिनयाप्रमाणेच रुपाली तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
रुपाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
काही दिवसांपूर्वीच रुपालीने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
रुपालीने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
या मराठमोळ्या लूकमध्ये रुपाली अतिशय सुंदर दिसत आहे.
-
या फोटोमध्ये रुपालीचा नऊवारी साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
-
रुपालीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – रुपाली भोसले / इन्स्टाग्राम)

“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल