-
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य सतत चर्चेत असतो. नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी हे अतिशय लोकप्रिय कपल आहेत. पण समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
तसेच समांथा आणि नागा चैतन्य घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. आता समांथाला एका मुलाखतीमध्ये या बाबात प्रश्न विचारण्यात आला होता. ती तिच्या सासऱ्यांच्या वाढदिवसालाही उपस्थित नव्हती.
-
समांथाने नुकतीच ‘द फिल्म कॅमपेन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘मी या सर्व अफवांवर आणि चर्चांवर तेव्हाच बोलेन जेव्हा मला योग्य वाटेल’ असे समांथा म्हणाली. समांथाने सध्या सुरु असलेल्या चर्चांवर मौन बाळगले आहे.
-
एकीकडे समांथा आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे समांथा मात्र घराच्यांना सोबत न घेता एकटीच आपल्या मैत्रिणींसोबत भटकंतीसाठी गेलीय.
-
समांथाने आपल्या ट्रीपचे काही फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेत.
-
तशी समांथा आपल्या चाहत्यांसोबत सोशल नेटवर्किंगवरुन कायमच कनेक्टेड असते. मात्र यंदा घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान तिचं असं एकटीने भटकंतीला जाणं चाहत्यांनाही खटकलंय.
-
शिल्पा रेड्डी आणि इशिका सिखा या आपल्या फार जवळच्या मैत्रिणींसोबत समांथा गोवा ट्रीपला गेलीय.
-
तिने गोवा ट्रीपदरम्यान शेअर केलेला हा फोटो.
-
या ट्रीपमधील काही फोटो जे समांथाने शेअर केलेत त्यात ती बोटींग करताना दिसतेय.
-
यावेळी तिच्या मैत्रिणींनाही तिला सोबत दिल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
-
मान्सूनचा पाऊस आणि दाटून आलेल्या ढगांचे फोटोही तिने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेत.
-
काही फोटोंमध्ये ती सायकलिंग करताना दिसत आहे.
-
हा विकेण्ड काहीसा असा गेला अशा कॅप्शनसहीत समांथाने हा फोटो शेअर केलाय.
-
समांथाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन पतीचं अडनाव म्हणजेच अक्किनेनी काढून टाकल्यापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु आहे.
-
सध्य़ा या चर्चा सुरु असल्या तरी समांथा गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)
रात्री झोपण्याआधी गूळ आणि तूप नक्की खा; सकाळी परिणाम पाहून थक्क व्हाल, डॉक्टरांनी स्वत: दिली माहिती