-
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका जानेवारी महिन्यात सुरु झाली आहे.
-
या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते.
-
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे.
-
एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
-
अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
-
मालिकेमध्ये सध्या ओम आणि स्वीटूचं नातं बहरताना दिसतंय. मात्र ओम म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
-
शाल्वने काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
-
शाल्व सोबत असलेली ही मुलगी कोण असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. खास करून अनेक तरुणींनी ही तुझी गर्लफ्रेंड आहे का? तुझं लग्न झालं आहे का? असे अनेक प्रश्न त्याला विचारले.
-
अभिनेता शाल्व किंजवडेकर रिलेशनशिपमध्ये आहे.
-
श्रेया डाफळापूरकर असे शाल्वच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे.
-
शाल्व आणि श्रेयाच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
नात्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाल्वने श्रेयासोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ‘Two years of madness and love’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते.
-
प्रेमसंबंध आणि खासगी आयुष्याबद्दल शाल्व जाहीरपणे बोलत नाही.
-
पण श्रेया सोबतचे सोशल मीडियावरील शाल्वचे रोमँटिक फोटो त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल सर्व काही सांगून जातात.
-
लोकसत्ताच्या डिजिटल अड्डावर शाल्वने त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल खुलासा केला.
-
लहानपणापासूनची मैत्री आणि त्यातून निर्माण झालेलं समजुतदारपणाचं नातं, जवळीक आणि सुसंगती असं काहीस घट्ट नात दोघांमध्ये असल्याचं त्याने सांगितलं आहे.
-
श्रेया ही स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे.
-
शाल्व किंजवडेकरने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शाल्व किंजवडेकर, श्रेया डाफळापूरकर / इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”