-
अभिनेत्री अमला अक्किनेनीचा आज १२ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.
-
अमला त्यांचा ५४ वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
अमला यांचा जन्म १२ सप्टेंबर १९६७ साली कोलकत्तामध्ये झाला.
-
त्यांनी सुपरस्टार नागार्जुनशी लग्न केले आहे.
-
त्या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला तर म अमाला यांच्या वाढदिवशी जाणून घेऊया…
-
अमला यांनी मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती.
-
त्यानंतर त्यांना हळूहळू चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
-
अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि अमाला या अतिशय लोकप्रिय अभिनेत्री ठरल्या.
-
अमला यांची पहिल्यांदा नागार्जुनशी भेट झाली तेव्हा नागार्जुनचे लग्न झालेले होते.
-
त्या दोघांनी एकत्र चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
ते एकमेकांसोबत वेळ घालवू लागले.
-
एकदा अमला चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना नागार्जुन त्यांना सरप्राइज देण्यासाठी सेटवर पोहोचला होता. पण तेथे पोहोचल्यावर अमाला रडत असल्याचे नागार्जुनने पाहिले. त्यानंतर नागार्जुनने अमाला यांना कारण विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, पुढचा सीन जो शूट करायचा आहे त्यावेळी मला घालायला दिलेले कपडे थोडे विचित्र आहेत आणि मला ते घालायचे नाहीत. तेव्हा नागार्जुनने त्यांना दिग्दर्शकाशी बोलण्याचा सल्ला दिला. तसेच नागार्जुनने देखील दिग्दर्शकाशी बोलून कपडे बदलण्यास सांगितले होते.
-
नागार्जुनचे वागणे पाहून अमला या इंप्रेस झाल्या आणि प्रेमात पडल्या.
-
त्यानंतर दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनी कधीही उघडपणे त्यावर वक्तव्य केले नाही.
-
एकदा पदरेशात चित्रीकरण करत असताना नागार्जुनने अमाला यांना प्रपोज केले.
-
अमला यांनी हो म्हणताच नागार्जुनने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि अमालाशी लग्न केले.
-
अमला आणि नागार्जुन यांना अखिल नावाचा एक मुलगा आहे.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा