-    ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ला अवघे चार दिवस शिलक आहेत. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत की यंदाच्या सिझन मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहे. अनके मोठमोठ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र अनेक कलाकार आहेत ज्यांनी या घरात जाण्यास नकार दिला आहे. 
-    अभिनेता सुयश टिळक ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात दिसणार अशा चर्चा रंगत होत्या. सुयशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 
-    ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमलेकरला Askmeanything सेशनमध्ये ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी घेणार का? असा प्रश्न विचारला होता या वेळेस तिने “अजिबात नाही” असे उत्तर दिले. 
-    छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळेने एका मुलाखतीत या शो मध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे. 
-    अभिनेत्री प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझनमध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशात या चर्चा बोगस असल्याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत प्रणितने ती या शोमध्ये सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे. “सोशल मीडियावर ज्या चर्चा रंगत आहेत त्या केवळ अफवा आहेत, मी ‘बिग बॉस मराठी’ मध्ये सहभागी होणार नाही. या शोचा भाग होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मला आवडेल मात्र या शोच्या निर्मात्यांकडून मला कोणत्याही प्रकारची ऑफर आली नाही. मला नाही ठाऊक की प्रेक्षकांना असे का वाटते आहे पण निदान यावेळेस तरी मी या शोचा भाग नसेन एव्हढे नक्की.” 
-    ‘काहे दिया परदेश’ मालिकेत ऋषी सक्सेनाने त्याच्या अभिनयामुळे लाखो लोकांचे मन जिंकले आहे. ऋषीने इन्स्टाग्रामवर Ask me anyting सेशन एका चाहत्याने तो ‘बिग बॉस मराठी’त सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर त्याने नाही असे उत्तर दिल्याचे दिसून आले. (All Photos-Instagram) 
 
  नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  