-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. आता बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक नावांची चर्चा सुरु आहे. चला पाहूया कोणत्या कलाकारांच्या नावाची चर्चा सुरु आहे..
-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अल्का कुबल या ओळखल्या जातात.
-
अल्का या बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात दिसणारा अंशूमण विचारे बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
-
अभिनेत्री सई रानडे बिग बॉस मराठी ३ मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
‘श्रीमंत घरची सून’ या मालिकेतील अभिनेत्री रुपाली नंद ही बिग बॉस मराठी ३मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत
-
बिग बॉस मराठी ३च्या घरात लोकप्रिय गायक संतोष चौधरी स्पर्धक म्हणून दिसण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
-
अभिनेता शुभांकर तावडे बिग बॉस मराठी ३मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
-
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता कमलाकर सातपुते बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
-
गुम है किसे के प्यार में, रात्रीस खेळ चाले या मराठी- हिंदी मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आदिश वैद्य बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!