-
प्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला नेहमीच सोशल नेटवर्किंगवर तिच्या पोस्टमुळे आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते.
-
सध्या अलाया ही मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून आपल्या पिकनिकचे काही भन्नाट फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना फारच पसंत पडल्याचं सोशल नेटवर्किंगवरुन दिसून येत आहे.
-
मागील काही दिवसांपासून अलाया अनेक फोटो शेअर करत असून यापैकी बरेच फोटो हे समुद्रकिनाऱ्यांवरील आहेत.
-
हिंदी चित्रपट सृष्टीमधील एकेकाळची गाजलेली अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी असणारी अलायाने आपल्या अभिनयाची चुणूक यापूर्वीच दाखवली आहे.
-
आपल्या अभिनयाइतकीच ती ग्लॅमरस असल्याचं तिचं सोशल नेटवर्किंग अकाऊंट पाहिल्यावर लगेच कळतं.
-
नारंगी रंगाच्या बिकीनेमध्ये अलायाने स्विमिंगपूलमध्ये बसून लंच करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
-
जेवण झाल्यानंतर तीस मिनिटांनी स्वीमिंगला जावं असं तिने या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
अलायाचं पूर्ण अडनाव फर्नीचरवाला असं असलं तरी ती सोशल मीडियावर अलाया एफ एवढच नाव वापरते.
-
अलायाने नुकतच तिच्या आगामी फ्रेडी या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं आहे.
-
शुटींग पूर्ण केल्यानंतर अलाया मालदीवला सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी गेली असून तिथून ती या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.
-
अलायाने पोस्ट केलेल्या या बिकिनी लूकमधील फोटोंना हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळत असून चाहत्यांना हे फोटो पसंत पडल्याचं दिसत आहे.
-
अलायाने २०२० साली ‘जवानी जानेमन’ या चित्रपटामधून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं.
-
‘जवानी जानेमन’ या चित्रपटामध्ये तिने अभिनेता सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.
-
इन्स्टाग्रामवर अलायाचे १० लाखांहून अधिक फॉ़लोअर्स आहेत.
-
सध्या तिच्या या मालदीव व्हेकेशनची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा दिसून येत असल्याचं चित्र आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…