-
क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एकीकडे जामीनासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे एनसीबी मात्र वेगाने कारवाई करत आहे. यादरम्यान एनसीबीचं एक पथक शाहरुख खानच्या घरी मन्नतवर पोहोचलं होतं.
-
त्यामुळे इतर वेळी फोटोसाठी चाहत्यांचा फेव्हरेट स्पॉट असणारा ‘मन्नत’ बंगला सध्या चर्चेत आहे.
-
शाहरुखचा मन्नत हा बंगला आतून कसा असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. चला तर पाहूया मन्नत हा बंगला आतून कसा दिसतो…
-
१९९५ साली शाहरुखने हा बंगला विकत घेतला होता.
-
त्यावेळी त्याची किंमत १५ कोटी रुपये होती. आताच्या घडीला या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये इतकी आहे. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
या बंगल्याचे इंटेरियर स्वतः शाहरुखची पत्नी गौरी खान हिने केलंय. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
६००० चौरस फुटांचा हा बंगला आहे. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
सोनेरी व राखाडी रंगाच्या कॉम्बिनेशनने बेडरुम डिझाइन करण्यात आला आहे. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
घरातील एका लाकडी फ्रेममध्ये शाहरुखच्या लहानपणीचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोमध्ये शाहरुख त्याच्या आईसोबत पाहायला मिळत आहे.
-
घरातील एका ठिकाणी शाहरुखला आतापर्यंत मिळालेले सर्व पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
शाहरुखच्या घरातील ऑडिटोरिअम.. या ऑडिटोरिअममध्ये ४२ खुर्च्या आहेत. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
ऑडिटोरिअमकडे जाणाऱ्या एका भिंतीवर ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाचा मोठा पोस्टर लावण्यात आला आहे. (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
गौरी खानचं ड्रेसिंग रुम (छायासौजन्य: वोग इंडिया)
-
(छायासौजन्य: वोग इंडिया)

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय