-
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र हे मागील ४१ वर्षांपासून पती-पत्नी आहेत. त्यांनी १९८० मध्ये लग्न केलं.
-
धर्मेंद्र यांनी आपली पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच दुसरं लग्न केलं होतं. यामुळे अनेक तर्कवितर्कही लावले गेले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतारही आले. याचा अंदाज हेमा मालिनी यांच्या एका मुलाखतीत येतो.
-
हेमा मालिनी यांनी २०१८ मध्ये नॅशनल हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत मला माझ्या आयुष्यात जे हवं होतं ते सर्व मिळालं नाही असं मत व्यक्त केलं होतं. यातून त्यांनी त्यांची धर्मेंद्र यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली होती.
-
तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात का असं विचारल्यावर हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “सर्वकाही अगदी व्यवस्थित आहे असं मी म्हणणार नाही. तारुण्यात प्रत्येकाला सर्वकाही अगदी परफेक्ट हवं असतं. प्रत्येकाला ते मिळतंच असं नाही.”
-
“मला जे सर्व पाहिजे होतं ते सर्व मिळालं नाही. मात्र, जी गोष्ट माझ्याकडे नव्हती तिची कमतरता जाणून देण्याची संधी कधीही स्वतःला दिली नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
-
धर्मेंद्रच्या गैरहजेरीवर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “कदाचित मी माझ्या पतीची सोबत जास्तच अपेक्षित धरली होती. मला वाटलं होतं आम्ही कायम सोबत राहू. पण मला आजपर्यंत त्याची कमतरता जाणवली नाही. लग्नानंतर आम्हाला सर्वांना योग्य असं जगता येईल असं वाटलं, पण ते झालं नाही. पण हरतक नाही.”
-
या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी आपल्या दोन मुलींच्या संगोपनाविषयी सांगताना त्यांच्यासोबत मला माझं बालपण आठवतं असंही नमूद केलं होतं. तसेच त्यांचं माझ्यावर खूप प्रेम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली