-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा नुकताच ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
सलमान खानचे आजवर जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.
-
पण त्याने कोणत्याही चित्रपटात किसिंग किंवा इंटिमेट सीन दिलेला नाही.
-
सलमान ऑनस्क्रीन किसिंग किंवा इंटिमेट सीन का देत नाही असा प्रश्न सर्वांनाच नेहमी पडतो.
-
आता ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने इंटिमेट आणि किसिंग सीन न देण्यामागचे कारण सांगितले आहे.
-
‘मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिका तुम्ही पाहिल्या आहेत आणि त्या साकारत असताना मी कधीही अपशब्द वापरलेला नाही. तसेच मी ऑनस्क्रीन कधीही इंटिमेट किंवा किसिंग सीन दिलेले नाहीत’ असे सलमान म्हणाला.
-
पुढे तो म्हणाला, ‘मी असे काहीच करत नाही आणि मला असे वाटते की चित्रपट नेहमी असेच असावेत. पण आजकाल ओटीटीमुळे एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो. मी स्वत: तो कंटेन्ट पाहात नाही. पण प्रेक्षक ते पाहतात.’
-
सलमानने पुढे कारण सांगत म्हटले, ‘सगळे करत आहेत म्हणून मी देखील तसे करावे असे माझे अजीबात नाही. आई-वडील, कुटुंबीय, घरातील लहान मुले माझे चित्रपट पाहात असतात. त्यामुळे मला असे सीन्स द्यायला आवडत नाहीत. मला माझी प्रतिमा स्वच्छ ठेवायला आवडते.’
-
सलमानचा अंतिम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटात आयुष शर्माने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
(PHOTOS CREDIT : SALMAN KHAN INSTAGRAM)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा