-
अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.
-
नुकतंच शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर तिच्या विरोधात पंजाबमध्ये आंदोलकांनी अभिनेत्री कंगना रणौतची गाडी रोखत जोरदार घोषणाबाजी केली होती.
-
तसेच या वक्तव्यांसाठी तिने माफीची मागणी केली.
-
यानंतर कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर करत आंदोलकांवर शिवीगाळ केल्याचा आणि हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.
-
या संपूर्ण प्रकरणानंतर आता कंगना ही मथुरामध्ये दाखल झाली आहे.
-
शनिवारी दुपारी अचानक कंगना मथुरामधील वृंदावनमध्ये दाखल झाली. यावेळी तिने श्री कृष्णाचे दर्शन घेतले.
-
कंगनाने तिचा हा संपूर्ण कार्यक्रम गुप्त ठेवला होता. तिने नुकतंच याबाबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना कॅप्शन देताना ती म्हणाली की, “भगवान श्रीकृष्णाचे दर्शन. कृष्णा, तुझे हे प्रेम आणि या दयाळू भावनेसाठी मी कोणते चांगले काम केले होते, हे मला माहिती नाही. राधे राधे,” असे कंगनाने म्हटले आहे.
-
कंगनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
-
यावेळी कंगनानेही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अप्रत्यक्षरिता टोला लगावला.
-
“मला फार आनंद होत आहे की मी भगवान श्रीकृष्णाची मोठी भक्त आहे. दर्शनानंतर मी फार उत्सुक आहे. मला फार आनंद झाला आहे. ज्या लोकांच्या मनात चोर आहे, त्यांना याचा निश्चितच त्रास होतो. मात्र जे लोक खरे, बहादूर, देशभक्त आहेत त्यांना माझ्या सर्व गोष्टी योग्य वाटतील. माझे कोणतेही वक्तव्य चुकीचे वाटणार नाही,” अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”