-
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा जेनिफरवर जबरदस्त मानसिक परिणाम झाला होता.
-
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत भाष्य केले आहे.
-
२०१४ ला एका हॅकरने अनेक सेलिब्रिटींचे ५०० हून अधिक प्रायव्हेट फोटो हे ऑनलाईन लीक करत एका वेबसाईटवर अपलोड केले होते.
-
यात जेनिफरसोबतच रिहाना आणि सलीना गोमेज या अभिनेत्रींचाही समावेश होता.
-
“सुरुवातीला न्यूड फोटोशूटमधील फोटो व्हायरल झाल्याबद्दल काहीही कल्पना नव्हती,” असे ती म्हणाली.
-
मात्र सोशल मीडियावर आपला न्यूड फोटोशूटमधील एक फोटो व्हायरल झाल्याचे बघितल्यानंतर तिला जबरदस्त धक्का बसला.
-
हा धक्का इतका जबरदस्त होता की, त्यामुळे अजूनही ती मानसिक तणावाखाली जगत आहे.
-
जेनिफर म्हणाली, “माझा न्यूड फोटो कधीही कोणीही माझ्या परवानगीशिवाय ऑनलाईन पाहू शकतो.”
-
“फ्रान्समधील एका व्यक्तीने हे सात वर्षांपूर्वी फोटो ऑनलाईन व्हायरल केले. ज्यामुळे मी अजूनही तणावाखाली जगत आहे.” असे तिने सांगितले.
-
दरम्यान जेनिफर लॉरेन्स सध्या ‘डोन्ट लुक अप’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
जेनिफर लॉरेन्सशिवाय लिओनार्डो डिकॅप्रियो, रॉब मॉर्गन, जोना हिल, एरियाना ग्रांडे, मेरील स्ट्रीप या सारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
-
येत्या १० डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
तर २४ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Maharashtra Breaking News Live Updates : उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं? राऊतांचे रोखठोक उत्तर; म्हणाले, “मग काय शिंदेंना…”