-
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरने त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या घराजवळ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वांद्रे येथे ४ बेडरूम-हॉल-किचन स्काय-विला खरेदी केला आहे. अभिनेत्याने या अपार्टमेंटसाठी २० ते २३ कोटी रुपये मोजल्याचं बोललं जात आहे. (Photo: Malaika Arora/Instagram)
-
अजय देवगणने जुहूमध्ये ६० कोटी रुपयांना वाडा विकत घेतला आणि तो त्याच्या सध्याच्या बंगल्याच्या अगदी जवळ आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने मीडिया रिपोर्टमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अजयने नूतनीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. (Photo: Kajol/Instagram)
-
बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईत ५,१८४ स्क्वेअर फुटांची मालमत्ता खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या मालमत्तेची किंमत ३१ कोटी रुपये आहे. बिग बींनी डिसेंबर २०२० मध्येच ही मालमत्ता खरेदी केली होती. मात्र त्याची नोंदणी एप्रिल २०२१ मध्ये झाली होती. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबईत आधीच दोन बंगले आणि इतर अनेक मालमत्ता आहेत. (Photo- Amitabh bachchan/Instagram)
-
जॅकलीन फर्नांडिस अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या जुहू येथील जुन्या घरात शिफ्ट झाली आहे. प्रियंका २०१६ मध्ये पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती आणि आता जॅकलीनने हे घर घेतलं आहे. अपार्टमेंटची किंमत ७ कोटी रुपये आहे. (Photo- Jacqueline Fernandez/Instagram)
-
कंगना रणौतने मुंबईतील तिच्या पहिल्या रिअल इस्टेट खरेदीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली होती. मुंबई शहरातील वांद्रे या पॉश लोकेशनमध्ये तिचं घर आहे. (Photo: Team Kangana Ranaut/Twitter)

“घरच्यांना वाटतं मुलगी कमवतेय पण ती…”, VIDEO पाहून कळेल मुलींच्या आयुष्यातला संघर्ष