-
बॉलिवूड अनेक कलाकार हल्ली विविध शो ला हजेरी लावतात. फक्त एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्हीवर हजेरी लावण्याचे ट्रेंड हल्ली मागे पडत चालला आहे.
-
हल्ली बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे अनेक रिअॅलिटी शो चे परिक्षणही करतात. यात माधुरी दीक्षितपासून मलायका अरोरापर्यंत अनेकांचा समावेश आहे.
-
एखाद्या रिअॅलिटी शो चे परीक्षक म्हणून ते कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतात. यामुळे रिअॅलिटी शो ला उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जायचे.
-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ‘झलक दिखला जा’ या सारख्या अनेक डान्स रिअॅलिटी शोचे परीक्षण करते. मिळालेल्या माहितीनुसार या शोच्या ७ व्या पर्वाच्या प्रत्येक एपिसोडसाठी ती १ कोटी रुपये मानधन आकारत होती.
-
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शो मध्ये अभिनेत्री मलायका अरोरा जजच्या भूमिकेत दिसली होती. याच्या एका सीझनसाठी तिला एक कोटी रुपये मिळाले.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने टीव्हीवरील अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत. शिल्पा ‘नच बलिये’, ‘जरा नचके देखा’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘सुपर डान्सर’ सारख्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘सुपर डान्सर’च्या पहिल्या सीझनसाठी तिने १४ कोटी घेतले होते. शिल्पा सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
-
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान हा टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे. ‘बिग बॉस १३’ पर्वासाठी त्याला प्रति एपिसोड १३ कोटी मिळत असल्याची बातमी आली होती. यानुसार, सलमानने केवळ १३ व्या सीझनद्वारे २०० कोटींची कमाई केली होती. याच्या प्रत्येक सीझनसाठी सलमानची फी वेगवेगळी असते.
-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही एका डान्स रिअॅलिटी शोला जज केले होते. या शोचे परीक्षण करण्यासाठी तिने ९ कोटी रुपये मानधन घेतले होते. ती ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसली होती.
-
अभिनेत्री करीना कपूर खान ‘डान्स इंडिया डान्स: बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’ या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. यासाठी तिला प्रति एपिसोड ३ कोटी रुपये फी देण्यात आली होती. या डान्स रिअॅलिटी शोमधून करीनाने टीव्हीवर पदार्पण केले होते.
बॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता हृतिक रोशन टीव्ही रिअॅलिटी शो ‘जस्ट डान्स’मध्ये दिसला होता. या शो चे परीक्षण करण्यासाठी तिने प्रति एपिसोड २ कोटी रुपये आकारले होते.

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”