-
‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे ही सतत चर्चेत असते. आज ८ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे. तिने भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज झहीर खानशी लग्न केले आहे. ते लग्नानंतर मुंबईमध्ये राहतात. त्यांचे आलिशान घर तुम्ही पाहिले आहे का? चला पाहूया…
-
सागरिकाने घरातील प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
-
तिने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.
-
हॉलमध्ये त्यांनी क्रिम कलरचे सोफे ठेवले आहेत.
-
सागरिकाने घरात अनेक पेंटींग लावले आहेत.
-
ती सतत सोशल मीडियावर घरातील फोटो शेअर करत असते.
-
झहीर खानने देखील लॉकडाउनच्या काळात सागरिकासोबत वेळ घालवतानाचे काही फोटो शेअर केले होते
-
गेल्या वर्षी सागरिकाने तिचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले होते
-
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सागरिकाने कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला होता.
-
यंदा ती कोणासोबत वाढदिवस हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
-
झहीर हा अतिशय शांत आहे आणि त्याच्या अगदी उलट सागरीका असल्याचे म्हटले जाते.
-
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली.
-
दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले.
-
मात्र, या दोघांनीही कोणालाच त्यांच्या प्रेमप्रकरणाची कानोकान खबर लागू दिली नाही.
-
पहिल्या भेटीत हे दोघंही एकमेकांना पसंत करू लागले असल्याचे म्हटले जाते.
-
दोघांच्या नंतर भेटीगाठी वाढल्या आणि अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसू लागले. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांवेळीही सागरिका त्याला पाठिंबा देताना दिसली.
-
युवराज सिंगच्या गोव्यात झालेल्या लग्नापासून जयपूरमधील रिसेप्शनमध्येही सागरिका-झहीर एकत्र दिसले.
-
शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
याव्यतिरीक्त तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक