-
बॉलिवूडचा किंग अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत असणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये पहिल्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती ७७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं. ‘रेड चिलीज’ ही प्रोडक्शन कंपनी २००३ साली त्याने सुरु केली.
-
अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे बिग बी. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ४०० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी ‘झंजीर’, ‘शोले’, ‘बॉम्बे टू गोवा’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन ७०चा काळ गाजवला होता. त्यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. डान्स आणि फिटनेसमुळे तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.
-
अभिनयासोबतच हृतिक रोशनचे व्यवसाय देखील आहेत. त्याची एकूण संपत्ती ३७० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याची एकूण संपत्ती ३१० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. सलमान खानच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत.
-
त्याने अनेक कलाकारांना चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी संधी दिली आहे. त्याची ‘बिंग ह्युमन’ या नावाची संस्था देखील आहे.
-
खिलाडी कुमार अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. ‘पॅडमॅन’, ‘हेरा फेरी’, ‘खिलाडी’ असे हिट चित्रपट त्याने दिले.
-
अक्षय कुमारची एकूण संपत्ती ३२५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटांद्वारे तो घराघरांत तर पोहोचलाच पण ‘पानी फाऊंडेशन’ या संस्थेद्वारे समाजकार्य करून त्याने लोकांची मनं जिंकली.
-
आमिर खानची एकूण संपत्ती २१० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
अभिनेता सैफ अली खान बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जातो. त्याची एकूण संपत्ती १५० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
निर्माता आणि अभिनेता कमल हसन याची एकूण संपत्ती १०० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने अभिनय शैलीने सिनेसृष्टीत स्वतःच स्थान निर्माण केलं. ‘विवाह’, ‘कबीर सिंग’, ‘जब वी मेट’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.
-
शाहिद कपूरची एकूण संपत्ती ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती ४५ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
-
‘ये जवानी है दिवानी’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘संजू’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”