-
‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी ही नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजासोबतच आणि हटके स्टाईलमुळे अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती. तिच्या या हटके फॅशनमुळे नेटकऱ्यांकडून चांगलंच ट्रोल देखील केलं जाते. पण त्याकडे ती दुर्लक्ष करते.
-
उर्फी जावेदने अनेकदा मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल विविध खुलासे केले आहेत. माझे कुटुंब हे पारंपारिक विचारांचे आहे. त्यांना खुलेपणाने विचार करण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यामुळेच मी घरातून पळून मुंबईत आली, असे खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.
-
त्यानंतर नुकतंच उर्फीने तिच्या कुटुंबाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबत तिने ते किती भाऊ-बहिण आहेत, याची माहितीही सांगितले आहे.
-
उर्फीने दिलेल्या माहितीनुसार, तिला ३ बहिणी आणि एक भाऊ आहे. उर्फीच्या तिन्ही बहिणी तिच्याप्रमाणे अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत.
-
उर्फीच्या सर्वात मोठ्या बहिणीचे नाव उरुसा जावेद असे आहे. उरुसा ही एक डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात काम करते.
-
उरुसा ही व्यावसायिक असली तरी ती इंस्टाग्रामवर कायम सक्रिय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
उरुसाचे इन्स्टाग्रामवर ७७.३ हजार फॉलोअर्स आहेत. उरुसाच्या इन्स्टाग्रामवर तिचे आणि उर्फीचे अनेक व्हिडीओही पाहायला मिळतात.
-
उर्फी जावेदच्या दुसऱ्या बहिणीचे नाव अस्फी जावेद आहे. अस्फी इंस्टाग्रामवरही सक्रिय आहे.
-
अस्फी ही ब्लॉगर असून ती फारच स्टायलिश आहे. विशेष म्हणजे ती ब्लॉगर असून फारच उर्फीप्रमाणे ग्लॅमरस दिसते.
-
उर्फी जावेदच्या तिसऱ्या बहिणीचे नाव डॉली जावेद आहे
-
डॉली ही एक ब्लॉगर आहे. इन्स्टाग्रामवर तिला अनेकजण फॉलो करतात. विशेष म्हणजे उर्फीप्रमाणे ती दिसायला बोल्ड आहे.
-
उर्फी जावेदला एक भाऊ देखील आहे. त्याचे नाव सलीम असे आहे.सलीम हा सगळ्या बहिणींचा लाडका आहे. सर्व भावंडांमध्ये तो सर्वात शांत पाहायला मिळतो.
-
उर्फी जावेदची आईही दिसायला खूप सुंदर आहे. झाकिया सुल्तान असे त्यांचे नाव आहे. त्या त्यांच्या पाचही मुलांवर फार प्रेम करतात.
-
विशेष म्हणजे उर्फीच्या आईने एकटीनेच तिच्या पाचही मुलांचे संगोपन केले आहे. कारण ती लहान असतानाच तिचे वडील आईपासून वेगळे झाले होते, असे अनेकदा उर्फीने सांगितले आहे.
-
(सर्व फोटो – उर्फी जावेद, उरुसा जावेद, अस्फी जावेद आणि डॉली जावेद/ इन्स्टाग्राम)

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल