-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्नाच्या घरी लगीनघाई सुरु आहे.
-
करिष्मा तन्ना ५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकतच करिष्मा आणि वरुण बंगेराचा हळदी समारंभ पार पडला. करिष्माने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हळदी समारंभासाठी करिष्माने खास पेहराव केला होता.
-
पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि ज्वेलरीमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
-
करिष्मा आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन आहे. एका कॉमन फ्रेंडद्वारे करिश्मा आणि वरुणची ओळख झाली होती.
-
करिष्मा आणि वरुणने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता. आता ५ फेब्रुवारीला दोघे लग्नगाठ बांधणार आहेत.
-
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘अदालत’ या मालिकांमधून करिष्मा घराघरात पोहोचली.
-
तसेच ‘बिग बॉस ८’, ‘नच बलिये’ या रिऍलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. ‘खतरो के खिलाडी १०’ या रिऍलिटी शो ची विजेती ठरली होती. (सर्व फोटो : करिष्मा तन्ना /इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक